AI Mobile App : शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मोबाईल ॲप

Agriculture Mobile App AI : मागील भागामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे कृषी क्षेत्रासाठी आवश्यक सल्ला देण्यातील पहिल्या दोन टप्प्यांची माहिती घेतली. त्यातून समस्येची ओळख पटवून त्याचे निदान करण्यापर्यंत आवश्यक अंकात्मक प्रतिमेचे तंत्रज्ञान पाहिले. एकदा समस्येची ओळख पटली, की पुढील टप्पा सुरू होतो, तो त्या संबंधित उपाययोजना सुचविण्याचा. त्यासाठी कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत आवश्यक ठरते
Agriculture Mobile App
Agriculture Mobile AppAgrowon
Published on
Updated on

Artificial Intelligence Update : शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये वनस्पती अथवा पिकाची छायाचित्रे घेऊन, त्याचे रूपांतर अंकात्मक प्रतिमेमध्ये केल्यानंतर त्याच्या लक्षणानुसार त्यावर विशिष्ट समस्या असल्याची ओळख पटविली जाते. एकदा नेमकी समस्या लक्षात आली, की या समस्येच्या संदर्भातील अन्य पैलूंची सांगड घातली जाते.

समस्येमागील कारणांचा शोध घेऊन, ते दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा शोध या पूर्वीच्या संकलित माहिती साठ्यामध्ये घेतला जातो. ती समस्या दूर करण्यासाठी आवश्यक ते उपाय संपर्क साधनाद्वारे (मोबाईल, संगणक, टॅबलेट वा अन्य) सुचविले जातात. त्यानुसार शेतकरी आपल्या शेतामध्ये उपाययोजनांचे नियोजन करू शकतो.

याही पुढील टप्पा म्हणजे शेतीमध्ये लावलेल्या विविध यंत्रे, उपकरणे यावरील ग्रहण संवेदकांकडे कोणत्या उपाययोजना करायच्या, याच्या सूचना पाठवल्या जातात. त्यानुसार ती यंत्रे आपोआप सुरूही होऊ शकतात.

आपल्या कृषी विद्यापीठामध्ये मोबाईल ॲप निर्मितीबाबत संशोधन कार्य सुरू असले तरी जर्मनीसारख्या प्रगत देशांमध्ये या तंत्रज्ञानावर फार पूर्वीपासून काम करण्यात येत आहेत. बर्लिन (जर्मनी) येथील PEAT GmbH या स्टार्टअप कंपनीने प्लांटिक्स (Plantix) हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले आहे.

त्याद्वारे पिकावरील कीड व रोगाचे निदान केले जाते. ते नियंत्रणामध्ये आणण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली जाते. त्याच प्रमाणे पिकावरील पोषक तत्त्वांच्या कमतरतेची लक्षणे ओळखून, ते दूर करण्यासाठी पीक व्यवस्थापन करण्याविषयी माहिती दिली जाते.

PEAT GmbH या कंपनीने उपाययोजना सुचविण्यासाठी इक्रिसॅट, फिटोकोन, आंध्र प्रदेशातील आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ, जर्मनीतील लेइब्निज विद्यापीठ, CIMMYT आणि PJTSAU या संस्थेचे सहकार्य घेतलेले आहे.

Agriculture Mobile App
AI Update : परिस्थिती ओळखून उपाय सुचविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

प्लांटिक्स मोबाईल ॲप कसे चालले ते पाहू...

१) डाउनलोड करणे

प्रथम आपल्या स्मार्ट मोबाइलमध्ये ‘प्लांटिक्स ॲप्लिकेशन’ डाउनलोड करावे लागले. अन्य कोणत्याही मोबाइल ॲप्लिकेशनप्रमाणे ‘Google Play Store’ वा अन्य ॲप्लिकेशन व्यासपीठावर जाऊन ‘Plantix’ हे स्पेलिंग टाकून शोध घ्यावा.

त्यानंतर तेथील ‘Install’वर क्लिक करावे. त्यानंतर त्याला आवश्यक त्या परवानग्या देत NEXT करत जावे. त्यानंतर तुमच्या फोनमध्ये ‘प्लांटिक्स’ स्थापित होऊन त्याचा आयकॉन मोबाइलमध्ये दिसेल किंवा त्याच ठिकाणी OPEN असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करावे.

२) समस्येचा फोटो अपलोड करणे

पिकाच्या कीड व रोग प्रभावित भागाचा फोटो किंवा प्रतिमा काढून ती ‘प्लांटिक्स ॲप’मध्ये समाविष्ट करण्यासाठी स्मार्टफोनच्या कॅमेरा वापरावा. आपल्या फोनच्या कॅमेराद्वारे पीक, फळझाड, त्यांची पाने किंवा कोणत्याही कीड व रोग प्रभावित भागांचे फोटो किंवा प्रतिमा अपलोड करावी. त्यावर पुढील विश्‍लेषण सुरू झाल्याचे चिन्ह दिसेल.

३) फोटोची ओळख पटवणे

मागील भागांमध्ये नमूद केल्याप्रमाणे ‘प्लांटिक्स’ ॲप कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे अपलोड केलेल्या फोटोची ओळख पटवते. त्यातून आपणास पीक, पिकावर पडलेला रोग किंवा कीड, पिकामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांच्या कमतरतेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जातो.

) नियंत्रणांसंदर्भात उपाययोजना सुचविणे

प्रभावित भागामध्ये कोणती समस्या आहे, याचे निदान झाल्यानंतर ती समस्या दूर करण्यासाठी विविध कृषी संशोधन संस्थांनी शिफारस केलेल्या उपाययोजनांची माहिती ॲपमध्ये दर्शविली जाते.

Agriculture Mobile App
Google Bard AI : 'चॅटजीपीटी'ला टक्कर देण्यासाठी गुगलकडून 'बार्ड'ची घोषणा!; बार्डची वैशिष्ट्ये काय?

वैशिष्ट्ये

• अ‍ॅपचे आरेखन (design) शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनुकूल व सोप्या पद्धतीने केले आहे.

• शेतकऱ्यांने पिकांवरील रोग, कीटक आणि पोषक तत्त्वांची कमतरता याची शंका आल्यानंतर फक्त पिकाच्या त्या प्रभावित भागांचे फोटो घेऊन अपलोड करावे लागतात. त्यानंतर त्वरित निदान करून उपाययोजना सुचविल्या जातात.

• या ॲपमध्ये फळे, भाजीपाला, तृणधान्ये अशा ८२ हून अधिक पिकांची व त्यावरील ६०८ हून अधिक रोगांची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे. या श्रेणीत १०.५ दशलक्षांहून अधिक विविध पिकांवरील रोगांच्या चित्रांचा माहितीसंच उपलब्ध आहे.

• हे ॲप शेतकऱ्याचे स्थान (लोकेशन), पीक निवड आणि विशिष्ट पीक समस्येवर आधारित व्यक्तिगत शिफारशी देते. यात कीड, रोग प्रतिबंधन व्यवस्थापन आणि पिकांचे आरोग्य संतुलित ठेवण्यासाठीही सल्ला दिला जातो.

• यातील ‘कम्युनिटी’अंतर्गत वेगवेगळे शेतकरी, तज्ज्ञ आपल्या समस्या, प्रश्‍न आणि आलेल्या अनुभवांचे आदानप्रदान करू शकतात. त्यातून शंकाचे निरसन होण्यास मदत होते.

• सोबतच शेतीसंबंधित ताज्या बातम्या, संशोधन निष्कर्ष आणि अन्य नावीन्यपूर्ण माहिती उपलब्ध केली जाते.

• हे ॲप १८ जागतिक भाषांमध्ये कार्यरत असून, त्यात मराठीसह भारतातील १० प्रमुख भाषांचा समावेश आहे.

- हे ॲप सध्या भारतातील ७० लाखांहून अधिक वापरकर्त्यांद्वारे डाउनलोड केले गेले आहे.

टीप - हे एका जर्मनस्थित स्टार्टअपने विकसित केलेले ॲप आहे. त्याची विस्तृत माहिती, वापर, वापरण्यासंबंधीचे निर्बंध इ. माहितीसाठी प्लांटिक्स मोबाइल ॲपची माहितीपत्रिका (मॅन्युअल) व्यवस्थित वाचावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com