Food Processing Agrowon
टेक्नोवन

विविध फळांपासून नाविन्यपूर्ण प्रक्रियायुक्त पदार्थ

पारंपारिक प्रक्रियायुक्त पदार्थाबरोबर नवनवीन मूल्यवर्धित पदार्थांना बाजारपेठेत मागणी वाढत आहे. बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन फळे, भाज्या व फुल काढणीपश्चात व्यवस्थापन विभागाने कोकम सरबत डीप बॅग,काजू बोंडाचे मसालेदार नेक्टर,जांभूळ - आवळा मिश्र नेक्टर निर्मिती तंत्र विकसित केले आहे.

टीम ॲग्रोवन

कोकम सरबत डीप बॅग :

१) कोकम हे कोकण विभागात येणारे बहुपयोगी फळ असून व्यापारीदृष्टया देखील यास विशेष महत्व आहे. या फळामध्ये औषधी गुणधर्म असून ते आम्लपित्तनाशक आहे.

२) कोकम रसातील हायड्रॉक्सी सायट्रीक आम्ल स्थूलपणा कमी करण्यास उपयुक्त आहे. कोकणामध्ये पिकलेल्या कोकम फळाच्या सालीचा उपयोग कोकम सिरप तयार करण्यासाठी केला जातो आणि सिरपमध्ये १:५ या प्रमाणात पाणी मिसळून कोकम सरबत तयार केले जाते.

३) विद्यापिठाच्या काढणीपश्चात विभागाने कोकम सरबत तयार करण्यासाठी 'टी बॅग' विकसित केली आहे. कोकम 'डीप बॅग' थंड पाण्यात (१२५ मिलि) थोडावेळ बुडवावी.त्यानंतर त्यामध्ये योग्य प्रमाणात साखर मिसळून उत्कृष्ट प्रतिचे जिरायुक्त कोकम सरबत अत्यंत सोप्या पध्दतीने तयार करता येते. या विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे पेटंट डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने नुकतेच मिळविले आहे.

काजू बोंडाचे मसालेदार नेक्टर ः

१) काजू बोंडाचे उत्पादन हे बी पेक्षा ३ ते ४ पटीने अधिक आहे. काजू बोंडामध्ये विशेष करून जीवनसत्व 'क' भरपूर प्रमाणात (२६० मि.ग्रॅ./१०० ग्रॅ.) असते.

२) काजू बोंडापासून सरबत, स्क्वॅश, सिरप, चटणी जॅम इ. पदार्थ तयार केले जातात. काजू बोंडाच्या रसाला थोडा उग्र स्वाद असल्यामुळे यापासून तयार केलेले सरबत किंवा अन्य पदार्थ ग्राहकांमध्ये कमी लोकप्रिय आहेत. हे लक्षात घेऊन काढणीपश्चात विभागाने कमी दर्प असलेले आणि उत्कृष्ट स्वादाचे मसालेदार नेक्टर (पेय) तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

३) २० टक्के काजू बोंडांच्या रसामध्ये ३ टक्के लिंबाचा रस, १ टक्का आल्याचा रस, ०.३ टक्के आम्लता, १५ टक्के साखर आणि उर्वरित पाणी वापरून स्वादिष्ट पाचक आणि मसालेदार असे काजू बोंडांचे नेक्टर तयार होते.

गाजराचा पेढा :

१) जीवनसत्व 'अ' युक्त पौष्टिक गाजराचा वापर हा प्रामुख्याने मुरांबा, कॅडी सारख्या दीर्घकाळ टिकणाऱ्या मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. गाजरापासून नाविन्यपूर्ण 'पेढा' तयार करण्याची पध्दत काढणीपश्चात व्यवस्थापन विभागात विकसित केली आहे.

२) 'पेढा' हा लोकप्रिय मिठाईचा पदार्थ प्रामुख्याने खवा वापरून केला जातो. परंतु खव्याचा वापर न करता उत्कृष्ट स्वाद आणि चवीचा गाजराचा पेढा तयार करता येतो.

३) गाजराचा पेढा तयार करण्यासाठी सर्वप्रथम रसरशीत गाजरे स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यांचे तुकडे करावेत. त्यानंतर गाजराचे तुकडे मिक्सरमधून काढून त्याचा एकजीव गर तयार करावा.त्यानंतर गाजराच्या गरात १:१ या प्रमाणात साखर मिसळावी. साखरेच्या ६७.५ टक्के दूध पावडर, १५ टक्के कॉर्न पावडर आणि ५ टक्के वनस्पती तूप मिसळावे. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत गरम करावे.

४) मिश्रण गरम असतानाच सिलिकॉन साच्यामध्ये ओतावे. मिश्रण घट्ट झाल्यावर तयार झालेल्या गाजराचा पेढा साच्यातून काढून फूडग्रेड प्लॅस्टिक बॅगमध्ये साठवावा. सदर गाजराचा पेढा हा सामान्य तापमानाला सुमारे १५ दिवसांपर्यंत खाण्यायोग्य सवरूपात टिकवून ठेवता येतो.

जांभूळ - आवळा मिश्र नेक्टर :

१) जांभळाचा हंगाम प्रामुख्याने एप्रिल, मे महिन्यात सुरू होतो. जांभळाच्या रसामध्ये फॉस्फरस, लोह, कॅल्शियम यासारखी खनिजद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात. फळाचा रस मधुमेहावर गुणकारी आहे.

२) जांभळाप्रमाणे आवळा हे देखील औषधी गुणधर्म असलेले फळ असून त्यामध्ये जीवनसत्व 'क' विपूल प्रमाणात (६०० ते ७०० मि. ग्रॅ./१०० ग्रॅ.) आढळते.

३) जांभळाच्या रसामध्ये 'ॲथोसायनिन' असल्यामुळे रसाला सुंदर जांभळा रंग असतो. याउलट आवळा रसात रंगद्रव्ये नाहीत, परंतु रसामध्ये 'क' जीवनसत्व जांभळापेक्षा भरपूर प्रमाणात आहे. अशा या दोन्ही फळांचा रस एकत्रितपणे वापरून त्यापासून जीवनसत्व 'क' युक्त मिश्र नेक्टर तयार करता येते.

४) मिश्र नेक्टर तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली जांभळे तसेच आवळे घेवून त्यांचा रस काढून घ्यावा. त्यानंतर जांभूळ आणि आवळा रस ७०:३० प्रमाणात एकत्रित मिसळून घ्यावा. त्यानंतर खाली दिलेले प्रमाण वापरून जांभूळ - आवळा मिश्र नेक्टर तयार करावे.

१. जांभूळ – आवळा रसाचे मिश्रण – २० टक्के

२. एकूण विद्राव्य घटक (साखर) – १५ ब्रिक्स

३. आम्लता (सायट्रिक आम्ल) - ०.२८ टक्के

४. पाणी – ६७.७२ टक्के

अशाप्रकारे आकर्षक रंग असलेले उत्कृष्ट स्वादाचे आणि जीवनसत्व 'क' युक्त जांभूळ - आवळा मिश्र नेक्टर (पेय) तयार करण्याची पध्दत विकसित करण्यात आली आहे.

संपर्क ः डॉ.प्रदीप रेळेकर, ७४२०८६१५९० (प्राध्यापक व प्रमुख, फळे, भाज्या व फुल काढणीपश्चात व्यवस्थापन विभाग, किल्ला रोहा, जि. रायगड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT