Smart farming innovations Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : भाजीपाला उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान

Hydroponics farming benefits : जमिनीवर वाढवलेल्या पिकांच्या तुलनेमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये पिकांची वाढ केवळ वीस ते पंचवीस टक्के पाण्यामध्ये करणे शक्य होते. या पद्धतीमध्ये पोषक पाण्याचा पुनर्वापर होतो. वाळवंटी तसेच दुष्काळी पट्ट्यामध्ये ही पद्धत उपयुक्त ठरते.

यशवंत जगदाळे

Agriculture Innovation :

जमिनीवर वाढवलेल्या पिकांच्या तुलनेमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये पिकांची वाढ केवळ वीस ते पंचवीस टक्के पाण्यामध्ये करणे शक्य होते. या पद्धतीमध्ये पोषक पाण्याचा पुनर्वापर होतो. वाळवंटी तसेच दुष्काळी पट्ट्यामध्ये ही पद्धत उपयुक्त ठरते.

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या साह्याने मातीविना शेती करता येते. मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषकतत्वे  पाण्याच्या माध्यमातून दिली जातात. या तंत्रज्ञानामध्ये पिकांच्या वाढीसाठी मुख्यतः पाण्याची आवश्यकता असते, पिकांना आधारासाठी मातीऐवजी परलाईट, कोकोपीट किंवा वाळू या माध्यमाचा वापर केला जातो. पाण्यामध्ये विद्राव्य खतांच्या माध्यमातून भाजीपाल्याचे पोषण केले जाते.

तंत्रज्ञानाचे फायदे

जमिनीचे प्रमाण मर्यादित असलेल्या किंवा प्रदूषित माती किंवा मातीची उपलब्धता नाही अशा स्थितीमध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. जागेचा कार्यक्षम वापर करता येतो.

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानासाठी वातावरणातील तापमान, आद्रता आणि प्रकाशाची तीव्रता यांचे पिकांच्या वेगवान वाढीसाठी आवश्यक प्रमाण ठेवले जाते. परिणामी वर्षभर उत्पादन घेणे शक्य होते.

जमिनीवर वाढवलेल्या पिकांच्या तुलनेमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये पिकांची वाढ केवळ वीस ते पंचवीस टक्के पाण्यामध्ये करणे शक्य होते. या पद्धतीमध्ये पोषक पाण्याचा पुनर्वापर होतो. वाळवंटी तसेच दुष्काळी पट्ट्यामध्ये ही पद्धत उपयुक्त ठरते.

पाण्यामध्ये  पोषक खनिजे कृत्रिमरीत्या पिकांसाठी मिसळली जातात. मातीच्या तुलनेत या पाण्याचा पीएच अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवता येतो. या परिणाम असा होतो, की पिकाद्वारे पोषक अन्नद्रव्यांचे अधिक शोषण होऊन अधिक वाढ होते. मातीतील पिकांच्या तुलनेमध्ये ५० टक्क्यांपर्यंत अधिक वेगाने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

हायड्रोपोनिक्समध्ये तण, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही किंवा मर्यादित राहतो. मशागत,आंतर मशागत, सिंचन, खुरपणी ही कामे करावी लागत नाही. परिणामी वेळ आणि मजुरांची बचत होते.

कमीत कमी जागेमध्ये वातावरण नियंत्रित पद्धतीचा वापर आणि भरपूर पोषक घटकांच्या उपलब्धतेमुळे भाज्यांचे दुप्पट आणि वर्षभर उत्पादन घेता येते.

विविध पिकांचे उत्पादन

या तंत्रज्ञानाने उपलब्ध जागेचा कार्यक्षम वापर करून भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. सर्व प्रकारचा परदेशी भाजीपाला, वांगी, सेलरी, बेसील, टोमॅटो, ढोबळी मिरची, लेट्युस, पालक, काकडी, ब्रोकोली, वाटाणा, बटाटा, वांगी, फळवर्गीय, सर्व प्रकारचा पालेवर्गीय भाजीपाला, बेरी, औषधी वनस्पती, तिखट मिरची इत्यादी रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात. चांगला नफा मिळविता येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

Solar Energy Projects: सांगलीत मागणीच्या ४० टक्के विजेची जिल्ह्यामध्येच निर्मिती

Healthy Village Campaign: ‘माझं गाव- आरोग्य संपन्न गाव’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Chinese Illegal Raisin: चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती

SCROLL FOR NEXT