E-Soil Agrowon
टेक्नोवन

'E-Soil' : पिकाच्या अधिक वाढीसाठी तयार केली ‘ई-सॉइल’!

Crop Growth : कोणत्याही पिकाच्या वाढीमध्ये माती, पाणी किंवा अन्य माध्यमे महत्त्वाची भूमिका निभावत असतात. यामध्येच मुळांची वाढ, अन्नशोषणासह सर्व क्रिया प्रक्रिया होत असतात

Team Agrowon

'E-Soil' Technology : कोणत्याही पिकाच्या वाढीमध्ये माती, पाणी किंवा अन्य माध्यमे महत्त्वाची भूमिका निभावत असतात. यामध्येच मुळांची वाढ, अन्नशोषणासह सर्व क्रिया प्रक्रिया होत असतात. मातीरहित माध्यमांमध्ये मुळांच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी विद्युत वाहकता आणण्याचे प्रयोग लिंकोपिंग विद्यापीठातील संशोधकांनी केले आहेत.

या प्रयोगामध्ये बार्ली या रोपांची वाढ सामान्य स्थितीच्या तुलनेमध्ये ५० टक्के अधिक होत असल्याचे स्पष्ट झाले. हे संशोधन ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दि नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

हायड्रोपोनिक्स प्रणालीमध्ये पाण्यामध्येच योग्य त्या प्रमाणात पोषक घटक पुरवले जातात. ही अत्यंत कार्यक्षम प्रणाली असून, सुमारे ९० टक्के पाण्याचा पुनर्वापर पुन्हा पुन्हा करता येतो. म्हणूनच पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी पाण्यामध्ये पिकाचे उत्पादन घेता येते. तसेच एकावर एक अशा थरांमध्येही लागवड करणे शक्य होते.

लिंकोपिंग विद्यापीठातील ऑरगॅनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रयोगशाळेतील सहयोगी प्राध्यापक आणि इलेक्ट्रॉनिक प्लांट्स ग्रुपच्या प्रमुख एलेनी स्टॅवरिनिडोऊ यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या गटाने या हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये वापरण्यायोग्य विद्युत प्रवाहकीय लागवड सब्सट्रेट विकसित केला आहे.

त्याला ई-सॉइल असे नाव दिले आहे. या प्रवाहकीय माध्यमामध्ये उगवलेल्या बार्लीच्या मुळांना मिळालेल्या विद्युत उत्तेजनांमुळे १५ दिवसांत रोपांची वाढ सामान्य हायड्रोपोनिक्सपेक्षा ५० टक्क्यांनी जास्त झाल्याचे स्पष्ट झाले.

एलेनी स्टॅवरिनिडोऊ म्हणतात, की एका बाजूला जगाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला हवामानातील बदलाचे आव्हान आ वासून समोर ठाकलेले आहे. त्यामुळे भविष्यात अन्नधान्यांच्या उत्पादनाची मागणी सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गांनी पूर्ण होणे शक्य नाही.

शक्य तितक्या क्षेत्रामध्ये, अगदी शहरी भागामध्ये, बंदिस्त घरांमध्येही अन्नधान्यांचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. अशा स्थितीमध्ये नियंत्रित वातावरणातील हायड्रोपोनिक्स शेती उपयोगी ठरणार आहे.

या हायड्रोपोनिक्स प्रणालीमध्ये विशेषतः लेट्यूस, औषधी वनस्पती आणि काही भाजीपाला पिकांची वाढ केली जाते. सामान्यतः चारा पिकांची लागवड केली जात नाही. मात्र या अभ्यासात हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये बार्लीच्या रोपांची लागवड करता येते आणि विद्युत उत्तेजनामुळे त्यांचा वाढीचा दर चांगला असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे.

त्याविषयी बोलताना एलेनी स्टॅवरिनिडोऊ यांनी सांगितले, की विद्युत उत्तेजना देऊन हायड्रोपोनिक्स पद्धतीने कमी संसाधनांमध्ये रोपांची जलद वाढ होऊ शकते. हे लक्षात आले असले तरी त्यामागे कोणत्या जैवरासायनिक प्रक्रिया घडतात, याविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. या विद्युत उत्तेजनेमुळे मुळे नायट्रोजनचे शोषण व अन्य प्रक्रिया वेगाने करत असल्याचे दिसून आले. इतकेच सध्यातरी आपण म्हणू शकतो.

या ‘ई-सॉइल’ची वैशिष्ट्ये

बहुतेकदा हायड्रोपोनिक्समध्ये लागवडीच्या सब्सट्रेट म्हणून खनिज लोकर (मिनरल वूल) वापरली जाते. या खनिज लोकरीची निर्मितीची प्रक्रिया अधिक ऊर्जा वापरणारी असून, तयार होणारी खनिज लोकर ही विघटनशील नाही. त्या ऐवजी ‘ई-सॉइल’मध्ये जैव पॉलिमर असलेल्या सेल्युलोज PEDOT नावाच्या प्रवाहकीय पॉलिमरसह मिसळलेला असतो. अशा प्रकारे मिश्रण करणे नवीन नसले तरी वनस्पती लागवडीसाठी इंटरफेस म्हणून त्याचा प्रथमच वापर केला आहे.

अशा संशोधनामध्ये पूर्वी मुळांना उत्तेजित करण्यासाठी उच्च व्होल्टेजचा वापर केला जाई. पण या नव्या संशोधनामध्ये वापरलेल्या नव्या ‘ई-सॉइल’मध्ये फारच कमी ऊर्जा वापरली जाते. उच्च व्होल्टेजचा धोकाही राहत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा!

SCROLL FOR NEXT