Agriculture Technology : खोडवा ऊस व्यवस्थापन यंत्राने वाचवले श्रम, मजुरी

Sugarcane Management : नगर जिल्ह्यातील दहिगाव- ने (ता. शेवगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) ऊस खोडव्याचे व्यवस्थापन करणाऱ्या ट्रॅक्चटरचलित सुधारित यंत्राच्या तंत्रज्ञानाचा प्रसार केला आहे.
Agriculture Update
Agriculture UpdateAgrowon

Technology of Tractor-Driven Improved Machinery : नगर जिल्ह्यातील पूर्वपट्ट्यात असलेल्या शेवगाव, नेवासा, तालुक्यातील शेतीला जायकवाडी मध्यम प्रकल्पाचा फायदा झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात ऊसपीक घेतले जाते. अनेक वेळा लागवडीच्या उसाकडे जेवढे काटेकोर लक्ष दिले जाते, तेवढे खोडवा व्यवस्थापनाकडे दिले जातेच असे नाही.

त्यातील सुरुवातीच्या मुख्य कामांमध्ये मजूरबळ, वेळही खूप लागतो. त्यामुळे खोडवा उसाच्या उत्पादकतेत घट येते. दहिगाव- ने (ता. शेवगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) निदर्शनास या बाब आल्या. येथील अभियांत्रिकी विभागाने त्यादृष्टीने खोडवा व्यवस्थापनात यांत्रिकीकरणाबाबत जागृती करण्याचे ठरविले.

तयार झाले यंत्र

केव्हीकेच्या अभियांत्रिकी विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ. राहुल पाटील यांनी स्थानिक कारागिरांची मदत घेतली. शेतकऱ्यांच्या ऊस व्यवस्थापनाच्या पद्धती लक्षात घेऊन प्रचलित ट्रॅक्टरचलित खोडवा व्यवस्थापन यंत्रात सुधारणा केल्या.

त्यातून यंत्राचे ‘मॉडिफाइड व्हर्जन’ तयार झाले. त्यासाठी केव्हीकेच्या श्री. मारुतराव घुले पाटील संस्थेचे डॉ. नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले तसेच केव्हीकेचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांचे मार्गदर्शन मिळाले.

Agriculture Update
Agriculture Technology : आधुनिक तंत्रज्ञानासह जोडधंद्याचा अंगीकार करा

तंत्रज्ञानाचा झाला प्रसार

केव्हीकेचे सुमारे सहा एकर ऊसक्षेत्र आहे. सन २०१७-१८ च्या दरम्यान आपल्या प्रक्षेत्रात तसेच दहा शेतकऱ्यांच्या शेतात यंत्राची प्रात्यक्षिके घेण्यास सुरुवात केली. या प्रयोगाचे निष्कर्ष चांगले दिसू लागले. त्यानंतर या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केली.

दरवर्षी दहा शेतकरी असे करीत एकेवर्षी तर ६० या प्रकारे ही संख्या आता हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. नगर, बीड, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांपर्यंत या तंत्रज्ञानाचा प्रसार झाला आहे. त्यसाठी शेतीशाळा, बांधावरील बैठकांतून अभियान राबवले.

खोडवा ऊस व्यवस्थापन यंत्र- वैशिष्ट्ये

ट्रॅक्टरचलित यंत्र १.१७ मीटर रुंद, १.४० मीटर उंच, तर ०.९० मीटर लांब आकाराचे आहे.

‘लोखंडी ॲगल’चा साचा वापरून यंत्रनिर्मिती.

यंत्राचे पाते, गिअरबॉक्स, रिजर या भागांमध्ये बदल केले.

बगला फोडणी (उसाची जुनी कमकुवत मुळे तोडणी व आंतरमशागत) व्यवस्थित करता यावी यासाठी यंत्राच्या फ्रेमच्या दोन्ही बाजूंना ‘रिजर’ बसवले आहेत. शेतकऱ्यांच्या लागवड पद्धती लक्षात घेऊन रिजरची लांबी, रुंदी व उंची ‘ॲडजेस्टेबल’ केली आहे.

यंत्राच्‍या मधोमध खालील भागात बुडखे छाटणीसाठी जमिनीलगत फिरणारे पाते बसवले आहेत.

प्रचलित यंत्रात चार पाती होती. ती आठ बसविली आहेत. त्यामुळे छाटणीत येणारी गुंतागुंत आता न होता हे काम चांगल्या प्रकारे होते. पूर्वी पाते फिरण्याचा वेग १७५ आरपीएम होता. गिअरबॉक्समध्ये बदल करून तो ३५० आरपीएम केला आहे.

‘फ्रेम’वर खतपेटी बसवली आहे. यामुळे बुडखे छाटणी, बगला फोडणी करतानाच खताचा बेसल डोस उसाच्या मुळांजवळ देणे म्हणजेच तीन कामे एकाचवेळी करणे शक्य होते.

Agriculture Update
Agriculture Technology : नाचणी मळणी, सडणीसह प्रक्रिया तंत्रज्ञान केले उपलब्ध

पाचट कुजवण्याची प्रक्रिया

पाचट कुजण्यासाठी ते सरीत दाबावे. एकरी चार लिटर वेस्ट डी कंपोझर, शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट (दोन बॅग्ज), पन्नास किलो युरियाची पाचटावर प्रक्रिया करावी. सुमारे तीन महिन्यांत पाचट कुजण्याची प्रक्रिया होते.

त्यातून एकरी ३ ते ४ टन सेंद्रिय खत तयार होते. त्याच्या सातत्यपूर्ण वापरातून यातून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. पाचट सरीत दाबून ‘मल्चिंग’ केल्यास तीन ते चार वेळा द्यावे लागणाऱ्या पाण्याच्या हप्त्यांमध्येही बचत होत असल्याचे केव्हीकेचे म्हणणे आहे.

लागवडीच्या ऊस तोडणीनंतर पाचट जाळणे जमिनीसाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे खोडवा उसाचे शास्त्रीयदृष्ट्या प्रभावी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या सर्व बाबीचा विचार करून यंत्रात सुधारणा केल्या.

‘खोडवा ऊस व्यवस्थापन यंत्राचा आम्हाला फायदा झाला आहे. त्याद्वारे बगला फोडल्याने नव्या मुळ्या येतात. वाढ जोमात होते. यातील व्यवस्थापनासह कार्बेनडाझिमची प्रक्रिया केल्याने छाटलेल्या बुडख्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ होते.
शुभम भरत आगळे खामगाव, ता. शेवगाव, जि. नगर
लागवडीच्या ऊस तोडणीनंतर पाचट जाळणे जमिनीसाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे खोडवा उसाचे शास्त्रीयदृष्ट्या प्रभावी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या सर्व बाबीचा विचार करून यंत्रात सुधारणा केल्या.
डॉ. राहुल पाटील, ८३०८८०७००१ (अभियांत्रिकी विभाग, केव्हीके, दहिगाव- ने)

यंत्राचे तुलनात्मक फायदे

पारंपरिक पद्धतीने खोडवा ऊस व्यवस्थापन करण्यासाठी प्रति एकर सुमारे १२ मजूर लागतात.त्यासाठी प्रति मजूर तीनशे रुपये पकडल्यास ३६०० एवढा खर्च येतो. यंत्राद्वारे एकरी दोन तासांत हे काम होऊन डिझेल व एका व्यक्तीचा मजूरखर्च पकडून सुमारे १२०० रुपये खर्च येतो. यातून मजूरटंचाईवर मात करण्यासह आर्थिक बचत होते.

यंत्राद्वारे काम केल्याने बेटाला फुटव्यांची संख्या पाच ते सातने वाढू शकते. गरजेनुसार खताची मात्रा वेळेवर मिळत असल्याने फुटवे अधिक बळकट येतात. त्यातून एकरी चार ते पाच टन उत्पादन वाढल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

डॉ. राहुल पाटील, ८३०८८०७००१ (अभियांत्रिकी विभाग, केव्हीके, दहिगाव- ने)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com