Onion Cultivation Agrowon
टेक्नोवन

Onion Cultivation : ट्रॅक्टरआधारित स्वयंचलित यंत्राद्वारे कांदा लागवडीचे प्रात्यक्षिक

Agriculture Technology : कांदा लागवड करताना मजुरांमार्फत दोन रोपांतील अंतर ठरावीक न राहता चिंगळी कांदा भरपूर निघतो, ज्याला योग्य दर मिळत नाही.

Team Agrowon

Solapur News : कांदा लागवड करताना मजुरांमार्फत दोन रोपांतील अंतर ठरावीक न राहता चिंगळी कांदा भरपूर निघतो, ज्याला योग्य दर मिळत नाही. तसेच अधिक उत्पादकताही वाढत नाही, या पार्श्‍वभूमीवर मानवलोक सामाजिक संस्थेच्या वतीने रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथे ट्रॅक्टरचलित स्वयंचलित यंत्राद्वारे कांदा लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

कांद्याची लागवड या यंत्राद्वारे केल्यास एका स्क्वेअर मीटरमध्ये पहिल्या गियरमध्ये ८८ रोपे बसतात, यानुसार एक एकरात ३ लाख १३ हजार २८० रोपे बसतात. दुसऱ्या गियरमध्ये ८० रोपे बसतात, यानुसार एक एकरात २ लाख ८४ हजार ८०० रोपे बसतात. तिसऱ्या गियरमध्ये ५६ रोपे बसतात, त्यानुसार एक एकरात १ लाख ९९ हजार ३६० रोपे बसतात.

एका स्क्वेअर मीटरमध्ये ६० ते ७० रुपये बसावीत, असे संशोधन केंद्र तथा विद्यापीठाची शिफारस आहे. त्यानुसार मर, तुटाळ लक्षात घेता दुसऱ्या गिअरमध्ये विद्यापीठाची ही शिफारस पूर्ण होते. एकरी २ लाख कांदे प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाचे झाले तर उत्पादन २० टनांपर्यंत वाढू शकते, असे या वेळी संस्थेच्या तज्ज्ञांनी सांगितले.

या वेळी कांदा लागवड यंत्राच्या प्रात्यक्षिकावेळी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ आणि कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मानवलोक या सामाजिक संस्थेच्या सीएसआर फंडामधून ही सोय करण्यात आली आहे. नजीकच्या काळात जागतिक उत्पादकतेच्या तुलनेत आपण किमान अर्ध्याहून अधिक उत्पादन साध्य करण्याचा मानस आहे.
- किरण गरड, समन्वयक, मानवलोक सामाजिक संस्था, उत्तर सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT