BBF Techmology Agrowon
टेक्नोवन

BBF Technology : जादा पावसातही बीबीएफवरील लागवडीची पिके जोमदार

एखादे छोटे तंत्रज्ञानही किती फायदेशीर ठरू शकते, याचा अनुभव यावर्षी बीबीएफ (रुंद, सरी, वरंबा) तंत्राने लागवड केलेले अनेक शेतकरी घेत आहेत.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा ः एखादे छोटे तंत्रज्ञानही (Agriculture Technology) किती फायदेशीर ठरू शकते, याचा अनुभव यावर्षी बीबीएफ (BBF Technique) (रुंद, सरी, वरंबा) (Broad Bed Furrow Technique) तंत्राने लागवड केलेले अनेक शेतकरी घेत आहेत. जास्त पाऊस होऊनही या शेतकऱ्यांची पिके दमदार असून पारंपरिक पीक लागवड (Traditional Crop Cultivation) केलेल्यांच्या तुलनेत नुकसानीचे प्रमाण खूप कमी आहे. रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड केलेल्या शेतांमध्ये पाणी न साचता सरीतून अतिरिक्त पाणी वाहून गेले. यामुळे पिकाला फटका बसला नाही.

जिल्ह्यात या वर्षात बुलडाणा तालुक्यात ६१५ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. मेहकर तालुक्यात साडेपाचशे मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. लोणार तालुक्यातही पावणेपाचशे मिलिमीटरपर्यंत पावसाने सरासरी गाठली. जिल्ह्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. या सलग पावसामुळे पिके पिवळी पडली. काही ठिकाणी सतत पाण्यात राहिल्याने पिके कुजलीसुद्धा. जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनची सर्वाधिक साडेतीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. जास्त पाऊस होऊनही बेडवर लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना फारसे नुकसान झालेले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यांच्या शेतांमधील पिके अधिक जोमदारपणे वाढीला लागलेले आहेत. दुसरीकडे पारंपरिक पद्धतीची लागवड असलेल्या शेतांमधील पिकांची वाढ तुलनेने कमी दिसत आहे.

मागील वर्षापासून सोयाबीन ही गादीवाफा म्हणजेच बेडवर व टोकण पद्धतीने करीत आहे. यासाठी एकरी १२ किलो बियाणे वापरले. त्यामुळे उत्पादनात सव्वापटीने वाढ झाली. मागील वर्षी फायदा झाल्यामुळे याहीवर्षी साडेतीन एकरात बेडवर व उर्वरित साडेचार एकरात डवऱ्याला दोरी बांधून सरी पाडली आहे. या दोन्ही पद्धतीमुळे अतिपाऊस होऊनसुद्धा नुकसान झालेले नाही. या वर्षी निश्चित चांगले उत्पादन येईल.
प्रकाश धांडे, येसापूर, ता. लोणार, जिल्हा. बुलडाणा
आमच्या परिसरामध्ये २५ जूनपासून पेरणीला सुरुवात झाली होती. पिकांची उगवण झाल्यानंतर पाऊस सुरू झाला. हा पाऊस सतत २६ दिवस सारखा एकसारखा पडत होता. आठ दिवस उघाड दिल्यानंतर पुन्हा आठवडाभर सतत पाऊस होत आहे. पेरणी बेडवर असल्यामुळे सरींमधून पाणी वाहून शेत शेवाळले आहे. तरीसुद्धा पीक बेडवर व बीबीएफ पद्धतीने लावल्याने चांगले आहे. विशेष म्हणजे यावर्षी डवरणीसुद्धा करू शकलो नाही.
प्रभाकर खुरद, भोसा. ता. मेहकर, जि. बुलडाणा.
शेतकऱ्यांना बीबीएफच्या तंत्राने लागवड करण्यासाठी कृषी विभागाने पेरणीपूर्वी प्रोत्साहित केले. अनेकांनी याचा वापर केल्याने यंदा जास्त पाऊस होऊनही त्यांची पिके उत्कृष्ट आहेत. हा मोठा फायदा झालेला आहे.
संतोष डाबरे, प्रभारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT