water monitoring apps bhujal
टेक्नोवन

Borewell Water Level Measurement App : बोअरवेलची पाणी पातळी मोजणं झालं सोपं, अ‍ॅपच्या माध्यमातून घेता येणार नेमका अंदाज

Team Agrowon

Water Level Measure : पाण्याची गरज वाढल्याने सर्वत्र बोअरवेल खोदल्या जात आहेत. बहुतेकांना बोअरवेलमध्ये पाण्याची पातळी नेमकी किती आहे. याची माहिती नसल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. पण आता फक्त मेटल कॅपवर टॅप करून बोअरवेलमधील पाण्याची पातळी मोजता येणार आहे.

 पुण्यातील स्टार्टअप कंपनीने एक अॅप विकसित केले आहे. ज्या माध्यमातून अर्ध्या मिनिटात बोअरवेलमधील पाण्याची पातळी मोजण्यास मदत करते.  या प्रक्रियेसाठी बोअरवेलची टोपी उघडण्याची आवश्यकता नाही. पाण्याची पातळी मोजल्याने व्यक्ती आणि संस्थांना बोअरवेलच्या वापराबाबत व्यवस्थापन करता येईल.

पुण्यातील वॉटरलॅब सोल्यूशन्स या कंपनीने हे अॅप विकसित केले आहे. अँड्रॉइड सिस्टीमवर काम करणारे भुजल अॅप गुगल प्लेस्टोअरवरून मोफत डाउनलोड करता येते. भुजल वॉटर मॉनिटरिंग अॅप्स सोनार तंत्रज्ञानावर काम करतात. वॉटरलॅब सोल्यूशन्सचे संस्थापक विजय गावडे यांनी सांगितले की प्रत्येक बोअरवेलला डिफॉल्टनुसार मेटल कॅपने झाकलेले असते. दोन सेकंदांच्या अंतराने धातूच्या टोपीला हातोडा किंवा लोखंडी रॉडने टॅप करणे आवश्यक आहे. भुजल अॅपवर कॅप्चर केलेल्या मेटलवर टॅप करून प्रतिध्वनी तयार होतो. त्यामुळे बोअरवेलमधील पाण्याची पातळी शोधण्यात मदत करते. संपूर्ण प्रक्रियेला 30 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागतो.

कंपनी अटल भुजल योजना, सात राज्यांमध्ये राबविण्यात येत असलेली भूजल व्यवस्थापन योजना आणि इतर एजन्सींसह गुजरात जलसंपत्ती विकास महामंडळासोबतही काम करत आहे. वॉटरलॅब हरियाणातील सुमारे 200 शेतकर्‍यांना नियमितपणे अॅप वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पायलट प्रकल्प राबवत आहे. तसेच महाराष्ट्रातील सिंजेंटा फाऊंडेशन आणि उस्मानाबाद येथील स्वयम् शिक्षण प्रयोग यांच्यासोबत काम करत आहे. वॉटरलॅबने भुजल अॅपचे पेटंट घेतले आहे आणि त्याची आयओटी वर्जन घेऊन येत आहे, ज्यासाठी त्यांनी यूएसमध्ये पेटंटसाठी अर्ज केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT