Agriculture Technology
Agriculture Technology Agrowon
टेक्नोवन

Artifitial Intelligence (AI) : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय रे भाऊ?

टीम ॲग्रोवन

गौरव सोमवंशी

आधुनिक तंत्रज्ञान (Modern Agriculture Technology) म्हणलं की मनात सर्वात अगोदर हा विचार येतो की हे सगळं भारतासारख्या विकसनशील देशात शक्य नाही. पण तंत्रज्ञानाची सुरुवात जरी क्लिष्ट आणि अत्यंत मर्यादित स्वरूपात होत असेल, तरीसुद्धा त्याची उत्क्रांती होऊन ते आपल्यापर्यंत येऊन पोचतेच. इंटरनेट आणि वैयक्तिक संगणक (Personal Computer) (पर्सनल कॉम्प्युटर) हे काही काळासाठी स्वतंत्र स्वरूपात वाढत होतेच. सुरुवातीला इंटरनेटचा उपयोग (Use Of Internet) फक्त वैज्ञानिक प्रयोगांची माहिती एका विभागातील शास्त्रज्ञांकडून दुसऱ्या विभागातील शास्त्रज्ञांकडे पाठवण्यासाठी होत असे. आणि आजच्या तुलनेने तेव्हाचे संगणक म्हणजे एक खोली भरून जाईल इतके विशाल असायचे. संगणकांची उत्क्रांती ही कमीतकमी जागेत अधिकाधिक संगणकीय ताकद सामावली जाईल या दिशेने होत गेली. आणि जेव्हा या दोन्ही तंत्रज्ञानांचा काळ जुळून आला, तेव्हा याचे समन्वय होऊन हे दोन्ही तंत्रज्ञान 'स्मार्टफोन'च्या स्वरूपात तुमच्या खिशात येऊन पोचलीत.

एका अभ्यासानुसार, असं भाकीत केलं आहे की २०३० पर्यंत भारतात १०० कोटी लोकांकडे इंटरनेट पोचलं असेल, आणि कमीतकमी ८४ कोटी लोकांकडे स्मार्टफोन असेल. ही झपाट्याने होणारी वाढ अटळ असून दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम बऱ्याच प्रमाणात अप्रत्याशित असेल. तरी सुद्धा आजची दिशा आणि वाटचाल बघून काही तंत्रज्ञानांबद्दल आपण बोलूच शकतो.

या लेखात आपण मुख्यतः ३ तंत्रज्ञानाचा कृषिक्षेत्र आणि शेतीव्यवसायावर होणाऱ्या आजच्या आणि भविष्यातील प्रभावावर बोलूया. ए.आय. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) (कृत्रिम प्रज्ञा), इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी- किंवा वस्तुजाल) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान. या तिन्ही तंत्रज्ञानांना 'उदयोन्मुख तंत्रज्ञान' असे म्हणले जाते. कारण ज्या पद्धतीने इंटरनेट हे नव्वदीच्या दशकातील उदयोन्मुख तंत्रज्ञान होते जे पुढे परिपक्व, प्रगल्भ वा प्रचलित झाले, तसेच ही तीन तंत्रज्ञानसुद्धा या दशकांसाठी उदयोन्मुख मानले जातात.

या तीन तंत्रज्ञानांचा शेती व्यवसायात कुठे आणि कसा वापर होतो, हे जाणण्याअगोदर आपण हे तिन्ही तंत्रज्ञान नक्की काय करतात ते समजून घेऊया.

ए.आय. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम प्रज्ञा)

उदाहरण घेऊया रेशीम कोषाच्या शेतीची. ज्यांनी रेशीमकोषाच्या सखोल अभ्यास केला आहे त्यांना अंड्यापासून ते कोषापर्यंत वेगवेगळ्या वाढीच्या काळात होणारे आजार हे लगेच बघून ओळखता येतात. पण या क्षेत्रात नवीन पदार्पण केलेल्या शेतकऱ्याला वेळीच ओळखता येईल का? आणि वेळीच ओळखून त्यास योग्य उपचार सुद्धा सुचतील का? अशा वेळी एका जाणकार आणि अनुभवी शेतकऱ्याची मदत लागेलच. पण हेच काम पुढे जाऊन त्या नवीन शेतकऱ्याची खिशातील साध्या स्मार्टफोनने केले तर?

जसं आपण माणसांना 'शिकवू' शकतो तशीच शिकवण आपण यंत्रांना आणि प्रोग्रॅमला देऊच शकतो. याच प्रक्रियेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम प्रज्ञा किंवा थोडक्यात 'ए.आय.' असं म्हणतात. म्हणजे की जो विचार करायला किंवा निर्णय घ्यायला अगोदर माणूस लागायचे, तेच काम सोपं करायला किंवा पूर्णपणे यंत्रांवर सोपवायला ए.आय.ची मदत होते. जितकी जास्त माहिती आपण 'ए.आय.'प्रोग्रॅमला देत राहू, तितकाच कालांतराने तो अजून प्रगल्भ होत राहतो.

gaurav@emertech.io

(लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे अभ्यासक असून उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT