Minister Dhamendra Pradhan Agrowon
टेक्नोवन

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Dhananjay Sanap

Delhi AI Research Centers: आरोग्य, कृषी आणि शाश्वत शहरांवर लक्ष केंद्रित करणारी तीन 'आर्टिफिशयल इंटेलिजन्स सेंटर्स ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. ते मंगळवारी (ता.१५) दिल्ली येथे बोलत होते. आर्टिफिशयल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगभर चर्चा सुरू आहे.

त्यामुळे भारतातील आरोग्य, कृषी आणि शाश्वत शहारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार देशात आर्टिफिशयल इंटेलिजन्स सेंटर्स ऑफ एक्सलन्स उभारले जाणार आहेत.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "दिल्ली येथील तीन आर्टिफिशयल इंटेलिजन्स सेंटर्स ऑफ एक्सलन्समुळे भारताची ओळख मजबूत होईल. जागतिक कृत्रिम बुद्धिमत्तेची तीन मंदिर म्हणून ही तीन सेंटर्स उदयास येतील. तसेच जागतिक पातळीवर समस्यांचे समाधानकारक उत्तरही या सेंटर्समुळे मिळतील," असा विश्वासही प्रधान यांनी व्यक्त केला.

यावेळी केंद्रिय उच्च शिक्षण विभागाचे सचिव के. संजय मूर्ती, सर्वोच्च समितीचे सह-अध्यक्ष आणि झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेंबू, नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरमचे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्रबुद्धे आदि उपस्थित होते.

डॉ. श्रीधर वेंबू म्हणाले, "येत्या १० ते २० वर्षांमध्ये या क्षेत्राची भरभराट व्हावी. त्यातून देशाची सेवा करता यावी यासाठी क्षमता असलेल्या युवाशक्तिवर लक्ष केंद्रीत करावं लागले. त्यासाठी कंपन्या पुढाकार घेतील. आणि त्यातून नवीन प्रतिभावंत निर्माण होतील." असं वेंबू म्हणाले.

दरम्यान, 'मेक एआय इन इंडिया आणि मेक एआय वर्क फॉर इंडिया' या संकल्पनेतून या केंद्रांच्या स्थापनेची घोषणा २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली होती. त्यानुसार केंद्र सरकारने तीन आर्टिफिशयल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्सच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. त्यासाठी एकूण २०२३-२०२८ या पाच वर्षासाठी ९९० कोटी रुपयांची मान्यता देण्यात आलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT