D D Kisan AI : 'डी डी किसान' आता देणार शेतकऱ्यांना २४ तास बातम्या; एआय आधारित अँकर दाखल!

क्रिश आणि भूमी हे दोन्ही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अँकर हुबेहूब माणसांसारखी दिसतात. माणसांसारख्याचा संवाद ते साधू शकतात. विशेष म्हणजे ५० देश आणि परदेशातील भाषांमध्ये दोन्ही निवेदक बोलू शकतात.
D D Kisan AI
D D Kisan AIAgrowon
Published on
Updated on

केंद्रीय कृषी मंत्रालयाने डीडी किसान वाहिनीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित दोन निवदेक (अँकर) आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता २६ मे २०२४ पासून क्रिश आणि भूमी दोन कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अँकर शेतकऱ्यांना बातम्या देणार आहेत. केंद्र सरकारने ९ वर्षांपूर्वी डीडी किसान वाहिनी सुरू केली होती. परंतु आता बदलत्या तंत्रज्ञानानुसार बदल करण्यात येत आहेत.

क्रिश आणि भूमी हे दोन्ही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अँकर हुबेहूब माणसांसारखी दिसतात. माणसांसारख्याचा संवाद ते साधू शकतात. विशेष म्हणजे ५० देश आणि परदेशातील भाषांमध्ये दोन्ही निवेदक बोलू शकतात. त्यामुळे न थांबता न थकता वर्षातील ३६५ दिवस आणि २४ तास शेतकऱ्यांपर्यंत डीडी किसान बातम्या पोहचवणार आहे, असा दावा कृषी मंत्रालयाने केला आहे.

D D Kisan AI
Drought 2024 : मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या तोंडाला पुसली पानं!

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना शेती मार्गदर्शन आणि माहिती देण्यासाठी २६ मे २०१५ रोजी डी डी किसान वाहिनी सुरू केली. आता रविवारी डी डी किसानला ९ वर्ष पूर्ण होत आहेत. दहाव्या वर्षात पदार्पण करताना डी डी किसाननं नवीन शैली आणि नवीन स्वरूपात शेतकऱ्यांपर्यंत माहिती घेऊन येण्याचा निर्णय घेतला. जागतिक पातळीवर तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेती क्षेत्रात केला जाऊ लागला आहे. खाजगी माध्यमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अँकरने वर्षभरापूर्वीच प्रवेश केला आहे.

डी डी किसानच्या क्रिश आणि भूमी या दोन अँकरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानातील बदल, जागतिक आणि स्थानिक बाजारपेठातील शेतीमालाचे भाव यांची माहिती पोहचवली जाणार आहे. दरम्यान, डी डी किसानची स्थापना करताना संतुलित शेती, पशुसंवर्धन आणि वृक्षारोपण या तीन संकल्पनांना मजबूत करण्याचा उद्देश असल्याचा दावा कृषी मंत्रालयाने केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com