Harvesting Agrowon
टेक्नोवन

Labor Shortage : मजुरांच्या टंचाईवर यांत्रिक कापणीचा पर्याय

Agriculture Mechanization : मजुरीचे वाढलेले दर, महागलेली बियाणे, खते आणि भाताला मिळणारा भाव यांचा विचार करता भातशेती करणे जिकिरीचे झाले आहे.

Team Agrowon

Thane News : मजुरीचे वाढलेले दर, महागलेली बियाणे, खते आणि भाताला मिळणारा भाव यांचा विचार करता भातशेती करणे जिकिरीचे झाले आहे. अशात या वर्षी मोठ्या प्रमाणात भात पीक आले आहे. शहापूर तालुक्यात अनेक शेतकरी कापणी यंत्राने भाताची कापणी करत आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे पारंपरिक पद्धतीने कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे भातकापणीसाठी लागणारा वेळ व मजुरांना द्यावा लागणारा मोबदला यांच्याशी तुलना करता किफायतशीर दरात, कमी वेळेत यंत्राद्वारे होत असलेली कापणी यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात आणि वेळेत बचत होत आहे.

शेतीत आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे सुपीक आणि मोठ्या आकाराच्या शेतजमिनीत कमी मेहनतीत पीक घेणे शक्य झाले आहे. असे असले तरी आजही शहापूरच्या सह्याद्री पट्ट्यात मशागत, नांगरणी, पेरणी, लावणी, कापणी, झोडणी ही कामे पारंपरिक पद्धतीनेच केली जातात. परंतु नांगरीसाठी वाढलेली मजुरी, मजुरांचा प्रवास खर्च, त्यांचा मोबदला यात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

या वर्षी मात्र ग्रामीण भागात कापणी यंत्राने शेतकऱ्यांच्या खर्चात बरीच बचत केली आहे. दिवसभरात भाताचे १०० भारे कापायचे तर चार ते पाच मजूर घ्यावे लागतात. त्यासाठी दिवसभरात तीन हजारापर्यंत खर्च येतो, परंतु कापणी यंत्र ताशी एक हजार रुपये या दराने तासाभरात १०० भाऱ्यांची कापणी करत असल्याने शेतकऱ्यांचा खर्च बराच कमी झाला आहे. शिवाय, कमी वेळेत काम पूर्ण होत असल्याने दिवसेंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्यांचे कष्टही कमी होत आहेत. त्यामुळे शेतकरी खूश असून कापणी यंत्राला सर्वत्र मागणी वाढू लागली आहे.

कापणी यंत्राला परिसरात प्रचंड मागणी वाढली आहे. यंत्रमालक आणि शेतकरी दोघांनाही या यंत्राने फायदेशीर शेतीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. एका तासाला सव्वा लिटर डिझेल लागते त्यातून एक एकर शेतीत कापणीचे काम पूर्ण होते.
- गणपत रघुनाथ बर्डे, कापणी यंत्रमालक, बर्डेपाडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT