Agriculture AI Agrowon
टेक्नोवन

Agriculture AI : भविष्यातील शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढणार

Agriculture Technology : शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यात आणखी बदल होत राहणार आहेत, पण भविष्यातील शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अधिक वाढणार आहे, असे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.

Team Agrowon

Solapur News : शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यात आणखी बदल होत राहणार आहेत, पण भविष्यातील शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अधिक वाढणार आहे, असे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.

कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथे सुरू असलेल्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या मार्गदर्शन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे होते.

श्री. गावसाने म्हणाले, की शेतीचे प्रश्‍न बदलतायेत, शेतीच्या कामात बदल होत आहेत. यापुढे व्यक्तिगत शेती करणे अवघड असणार आहे, त्यासाठी गटशेती फायद्याची ठरणार आहे. गट शेतीच्या माध्यमातून आपली तांत्रिक ज्ञानाची गरज भागविण्यासाठी वेगवेगळ्या कृषिविषयक कार्यालयांशी सामूहिकरीत्या संपर्क करणे आणि आपल्या समस्या सोडवून घेणे अधिक सोपे राहणार आहे, असे ते म्हणाले.

डॉ. तांबडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कृषी क्षेत्रात अजून व्यापक प्रमाणात होणार आहे, शेतकरी बांधवांनी या विषयी जागृकता दाखवत हे तंत्रज्ञान समजून घ्यावे, असे सांगितले.

विविध विषयांवर तांत्रिक सत्रे

तांत्रिक सत्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. शिल्पा परशुराम यांनी या वेळी डाळिंब लागवड व त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ या विषयी मार्गदर्शन केले. तसेच बारामती कृषी विज्ञान केंद्राचे मृदाशास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पादन घेणारे शेकडो शेतकरी आहेत. कोल्हापूरपासून नांदेडपर्यंत शेतकऱ्यांच्या यामध्ये सहभाग आहे.

ए.आय.चा वापर करून पिकाला लागणाऱ्या पाणी, खते, मजुरी, वीज प्रदूषण यामध्ये बचत करता येते. तसेच अचूक निदानाद्वारे शेतकऱ्यांना आगाऊ सूचना मिळाल्यामुळे पिकातील कीड व रोग व्यवस्थापन करणे शक्य होते, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT