सौर शुद्धजल संयंत्र 
टेक्नोवन

सौर ऊर्जा उपकरणाचे उपयोग, फायदे

हेमंत श्रीरामे, पूनम चव्हाण, मयूरेश पाटील

भविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी सौर ऊर्जा हा अतिशय चांगला पर्याय आहे. शेतीसोबतच दैनंदिन जीवनात जर सौर उपकरणांचा जास्तीत जास्त वापर केला, तर कमी खर्चामध्ये बरीचशी कामे पार पाडली जाऊ शकतात. सौर उपकरणांमुळे उत्तम प्रकारे अन्न शिजविता येते. अशुद्ध पाण्याचे शुद्ध पाण्यात रुपांतर करता येते. सौर यंत्रणेच्या साह्याने पाणी उपसले जाते. फोटोव्होल्टाईक साधने सौर ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करतात. याचा वापर विद्युतपंप चालविण्यासाठी होतो. पंपिंग यंत्रणा, उघडी विहीर, कूपनलिका, ओढा, तळे, कालवा यांमधून पाणी खेचते. सौर ऊर्जेवरील सौर उष्णजल संयंत्राद्वारे गरम पाणी रोजच्या वापरासाठी वापरले जाऊ शकते. सौर उपकरणे पर्यावरणासाठी कोणत्याही प्रकारे हानीकारक नाहीत. यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही. फायदे १. सौर उष्णजल संयंत्र उपयोग

  • आंघोळीसाठी पाणी गरम करण्याकरिता.
  • गरम पाणी भांडी धुण्यासाठी.
  • हॉटेल्स, वसतिगृह, मंदिरे, गुरुद्वारे इ. ठिकाणी.
  • विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी विविध शाळांमध्ये.
  • निरनिराळ्या हॉस्पिटल्समध्ये.
  • घरगुती कृषी प्रक्रिया उद्योगासाठी.
  • औद्योगिक वापरासाठी.
  • फायदे

  • कोणत्याही प्रकारची पारंपरिक ऊर्जेची आवश्यकता नसते.
  • सौर उष्णजल संयंत्राच्या वापरामुळे एक कुटुंब प्रत्येक महिन्याला २००-२५० रुपयांची वीजबिलामध्ये बचत करतो.
  • पारंपरिक ऊर्जेवर अवलंबून नसते.
  • वीजपुरवठा उपलब्ध नसतानादेखील आवश्यक त्या वेळी गरम पाण्याची उपलब्धता असते.
  • प्रदूषणविरहित साधन.
  • महागड्या विजेचा वापर इतर महत्त्वाच्या कार्यासाठी करण्याची मोकळीक.
  • २. सौर चूल उपयोग

  • घरगुती स्वयंपाकासाठी.
  • हॉटेल्स, मेस, कॅन्टीन इत्यादी ठिकाणी.
  • विविध प्रकारची खाद्य सामुग्री भाजण्यासाठी.
  • कोणत्याही प्रकारचे इंधन उदा. एल. पी. जी. गॅस, विद्युत, लाकूड इत्यादींची स्वयंपाक तयार करण्यासाठी आवश्यकता नसते.
  • या चुलीद्वारे तयार केलेले अन्न चविष्ट असते.
  • या चुलीद्वारे तयार केलेल्या पदार्थांत पौष्टीक तत्त्वांचा -हास होत नाही.
  • शिजविण्यासाठी ठेवलेले अन्न जळत नाही किंवा खराब होत नाही.
  • ३. सौर शुद्धजल संयंत्र उपयोग

  • अशुद्ध पाण्याचे शुद्ध पाण्यात रुपांतर करण्यासाठी.
  • डिस्टील वॉटर तयार करण्यासाठी.
  • खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी.
  • दररोज ३-४ लीटर प्रति वर्ग संयंत्रामधून शुद्ध (डिस्टील वॉटर) जल मिळते.
  • प्रतिमाह एक संयंत्रापासून १०००-२००० रुपये कमवू शकतो.
  • पाण्याचे वाफेत रूपांतर करण्यासाठी पारंपरिक विद्युतची आवश्यकता नाही.
  • पर्यावरणावर कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.
  • ४. सौर फोटो व्होल्टाईक साधने उपयोग

  • विद्युत निर्मिती करणे.
  • सौर कंदील, सौर पंप, सौर फवारणी यंत्र, सौर पवन विद्युत यंत्र तसेच विविध घरगुती उपकरणे सौर विद्युतवर चालविण्यासाठी.
  • वारंवार ऊर्जा तयार करता येते.
  • या ऊर्जेचा पर्यावरणावर कोणताही विपरित परिणाम होत नाही.
  • पर्यावरणात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
  • संपर्क ः हेमंत श्रीरामे, ९४२२५४५९१५ (विद्युत आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

    Soil Health : जमिनीचे आरोग्य सांभाळणे गरजेचे

    Nagnathanna Nayakvadi : नागनाथअण्णांसारख्या क्रांतिकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य

    Wild Boar : रानडुकराला उपद्रवी वन्य प्राणी घोषित करा

    Lumpy Skin Disease: पुण्यात 'लम्पी'चा विळखा; सुप्रिया सुळेंची महापालिका आयुक्तांना उपाययोजनांची पत्राद्वारे विनंती

    SCROLL FOR NEXT