परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक पत्रावळी व्यवसायात 
टेक्नोवन

परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक पत्रावळी व्यवसायात

आपल्याकडे यत्किचिंत मानल्या जाणाऱ्या पत्रावळी किंवा द्रोण परदेशामध्ये मात्र भाव खात आहेत. पर्यावरणपूरक म्हणून त्यांचे उत्पादन, विक्री आणि जाहिरातीद्वारे मार्केटिंग यातून हे साध्य होत आहे. जर्मनीतील एक कंपनी भारतीय पत्रावळीचे उत्पादन, विक्री करत आहेत.

टीम अॅग्रोवन

ओरडणाऱ्याची मातीही विकली जाते, अशा आशयाची म्हण मराठीमध्ये आहे. आपल्या उत्पादनांची उत्तम जाहिरात, त्यांचे गुणधर्म लोकांपर्यंत पोचवल्यास त्याला उत्तम किंमत नक्कीच मिळते. आपल्याकडे यत्किचिंत मानल्या जाणाऱ्या पत्रावळी किंवा द्रोण परदेशामध्ये मात्र भाव खात आहेत. पर्यावरणपूरक म्हणून त्यांचे उत्पादन, विक्री आणि जाहिरातीद्वारे मार्केटिंग यातून हे साध्य होत आहे. जर्मनीतील एक कंपनी भारतीय पत्रावळीचे उत्पादन, विक्री करत आहेत. या पूर्वीही पश्चिमेतील देशामध्ये बाजारात आणलेले भारतीय पद्धतीचे टॉयलेट (स्कॉटी पॉटी या नावाने), हळदीचे दूध चाय - ‘टी लॅट्टे’ म्हणून लोकप्रिय झाले आहेत. या बहुतांश परदेशी कंपन्यांनी भारतीय पर्यावरणपूरक पद्धतीचा कोणताही उल्लेख केलेला दिसत नाही. क्रेडिट दिलेले दिसत नाही. भारतामध्ये आपण काय जेवतो, तसेच कसे जेवतो, यावर प्रामुख्याने भर दिला जातो. विविध पदार्थ हे ताजेच किंवा संपूर्ण तोंडात टाकायचे असतात. उदा. पाणीपुरी. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिश या प्रामुख्याने प्लॅस्टिकच्या वापरल्या जातात. त्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पानांपासून बनवलेले द्रोण किंवा छोट्या डिश भारतात अनेक ठिकाणी वापरल्या जातात. पारंपरिकपणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याला पत्रावळ, पत्तल किंवा विस्तार या नावाने ओळखले जाते. ही परंपरा अगदी प्राचीन असून आयुर्वेदाचे आचार्य चरक यांच्या चरक संहितेच्या पहिल्या प्रकरणामध्ये त्याचा उल्लेख येतो. अगदी गेल्या काही वर्षापर्यंत गावपातळीवरील एकही पंगत या द्रोण -पत्रावळीशिवाय उठत नसे. लिफ रिपब्लिक २०१६ मध्ये या पत्रावळीच्या हरित व्यवसायात जर्मनीतील लिफ रिपब्लिक ही कंपनी उतरली. त्यांनी पानांपासून नैसर्गिक प्रक्रियेतून तयार केलेल्या टेबलवेअर बाजारात उतरवली. पाश्चिमात्यांच्या गरजेचा विचार करून त्यांना साजेशा बाउल, प्लेट्स, ट्रे इ. उत्पादनांची श्रृंखला आणली. हे होते त्यांचे वैशिष्ट्य

  •  चार थरांची पत्रावळ. त्यातील दोन थरामध्ये पाम तंतूपासून तयार केलेल्या पाणी रोधक पेपरचा थर देण्यात आला. सर्वात वर बायोप्लॅस्टिक लावण्यात आले.
  •  त्यांच्या उत्पादनासाठी संपूर्ण स्वयंचलित प्रक्रिया राबवली.
  •  कोणत्याही प्लॅस्टिक, तेल, चिकटद्रव्ये किंवा रसायनांव्यतिरीक्त संपूर्ण सेंद्रिय असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
  • या कंपनीने भारतीय उत्पादन असल्याचे कोणतेही क्रेडिट न देता ही उत्पादन श्रृंखला बाजारात आणली होती. त्यांचा एक सेट ८.५० पौंड म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ८७३) विकला जात होता. मात्र काही कारणाने २०१८ मध्ये लिफ रिपब्लिकने हे उत्पादन बंद केल्याची घोषणा केली.
  • दुसरी कंपनी ः लिफ लिफ रिपब्लिक ही काही एकमेव कंपनी नाही. दुसरी एक लिफ (Leef) नावाची जर्मन कंपनीही जैवविघटनशील टेबलवेअर उत्पादनामध्ये उतरली आहे. त्यांनी युरोपातील पाम पानांपासून उत्पादने तयार केली होती. त्यांनी जाहिरातीमध्ये आपण जागतिक दर्जाचे पाम लिफ टेबलवेअर उत्पादक असल्याचा दावा केला आहे. लिफ कंपनीच्या पत्रावळीची किंमत ११.५० युरो (म्हणजेच १००० रुपये) ठेवली असून, ती उत्पादने अद्याप विकली जात आहेत. या उत्पादनांना जर्मनीचे प्रमाणपत्र घेतले आहे. ही कंपनी अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये सर्वात मोठी पर्यावरणपूरक टेबलवेअर पुरवठादार आहे. भारतीय स्टार्टअप - विस्तारकू भारत आणि अनेक आशियायी देशांमध्ये पत्रावळी बनविण्याचा पारंपरिक आणि घरगुती पातळीवर केला जाणारा उद्योग आहे. त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. ग्रामीण भागामध्ये महिला या व्यवसायामध्ये प्रामुख्याने आहेत. अलीकडेच भारतातही काही स्टार्ट अप या व्यवसायात उतरले आहेत. हैदराबाद येथील वेणुगोपाल आणि माधवी विप्पूलांचा यांनी २०१९ मध्ये विस्तारकू हे स्टार्ट अप सुरू केले. माधवी या स्वतः फार्मसीचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन पूर्व प्राथमिक शिक्षिका म्हणूनही कार्यरत होत्या. वेणू विप्पूलांचा हे मेकॅनिकल इंजिनिअर असून , गेल्या दोन दशकापासून सामाजिक कार्य करतात. प्लॅस्टिक प्रदूषण, वाया जाणारे अन्न या संदर्भात ते विविध शाळांसोबत काम करत असताना त्यांनी ही कल्पना सुचली. आता ते विस्तारकू (म्हणजेच तेलगू भाषेमध्ये पत्रावळ) या नावाने पर्यावरणपूरक पत्रावळी तयार करत आहेत. ते तेलंगण आणि आंध्रप्रदेश येथील ग्रामीण भागातील महिलांकडून पत्रावळी तयार करून घेत आहेत. त्यांच्याकडे ६ इंचापासून १० इंचापर्यंत न्याहरीसाठी, तर ११ इंचापासून १६ इंचापर्यंत जेवणासाठी पत्रावळी ताटे उपलब्ध आहेत. त्यांच्या वेबसाइटवर या पत्रावळी आकारानुसार १७५ ते २२० रुपयांपर्यंत विक्रीसाठी आहेत. तर जागतिक पातळीवर विस्तारकू या नावाने २५ पत्रावळींचा सेट (१२ इंच व्यासाच्या) अॅमेझॉन या ऑनलाईन व्यासपीठावर ३८९ रुपयांना विकल्या जातात.  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Ativrushti Madat: २ ते ३ हेक्टरच्या नुकसानीपोटी १२० कोटींची मदत मंजूर; ८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत

    Rabbi Anudan GR : रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपयांचा शासन निर्णय जारी; मदत कोणत्या जिल्ह्यांसाठी?

    Crop Loss Compensation: अमरावतीला दिलासा; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५७० कोटींची मदत जाहीर

    Crop Advisory: कृषी सल्ला : राहुरी विभाग

    Rabbi Anudan Scheme : हेक्टरी १० हजार अनुदानासाठी १७६५ कोटी रुपये मंजूर; ७ जिल्ह्यांतील २१ लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत

    SCROLL FOR NEXT