फवारणी, धुरळणीसाठी आधुनिक यंत्रे 
टेक्नोवन

Latest Agriculture Mechanization : फवारणी, धुरळणीसाठी आधुनिक यंत्रे

पिकांच्या एकूण व्यवस्थापनामध्ये कीड व रोगापासून पिकाचे संरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. त्यासाठी फवारणी व धुरळणीची आधुनिक अवजारे विकसित करण्यात आली आहेत. त्यांची माहिती या लेखातून घेऊ.

डॉ. टी. एस. बास्टेवाड

हस्तचलित रोटरी डस्टर (मनुष्यचलित)

  • पिकावरील कीड व रोग नियंत्रणासाठी भुकटी धुरळण्यासाठी उपयुक्त.
  • टाकी क्षमता ५.२ लिटर.
  • सौरचलित बॅटरी फवारणी यंत्र (मनुष्यचलित)

  • या यंत्रामध्ये सौरऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. त्या ऊर्जेवर फवारणीचे काम पार पाडले जाते.  
  • शेतातील पिकांवर फवारणी करत असतानाही बॅटरी चार्ज करते. सौरऊर्जेचा वापर करते. 
  • या यंत्रासाठी सोलर पॅनेल, १२ व्होल्ट क्षमतेच्या बॅटरीची आवश्यकता असते.    यामध्ये बॅटरी रिचार्ज करून वापरता येते. 
  • टाकी क्षमता- १५ लिटर.
  • नॅपसॅक मिस्ट ब्लोअर कम डस्टर (मनुष्यचलित)

  • पाणी मिश्रित रसायनांच्या किंवा भुकटीच्या फवारणीसाठी उपयोगी.
  • हाताळण्यास सोईस्कर.  
  • हे यंत्र पेट्रोल इंजिनद्वारे चालते. 
  • फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत 
  • टाकीची क्षमता ११.५ लिटर.   
  • ट्रॅक्टरचलित सेन्सरयुक्त फवारणी यंत्र

  • विद्यापीठामध्ये या यंत्राची डाळिंब फळबागेसाठी प्रक्षेत्रीय चाचणी घेण्यात आलेली आहे. 
  •   सेन्सरमुळे फळबागेतील केवळ झाड व त्याच्या पर्णसंभारावरच फवारणी करता येते. यामुळे जमिनीवर रसायने वाया जात नाहीत. 
  • या यंत्रात अल्ट्रासॉनिक सेन्सर, मायक्रो कंट्रोलर बोर्ड, सोलेनॉईड व्हॉल्व्ह, स्प्रे पंप, प्रेशर गेज, नोझल आणि १२ व्होल्ट बॅटरी इ. समावेश आहे. 
  • सेन्सरसह शंकूच्या नोझलसाठी किमान २०० लिटर प्रति हेक्टर एवढी क्षमता आहे.
  • बैलचलित फवारणी यंत्र 

  • हे यंत्र बैलाच्या साह्याने चालवता येते. बैलाच्या चालण्यामुळे टाकीमध्ये स्वयंचलित दाब निर्माण होतो. 
  • लांबी १५ फूट व ११ नोझलमुळे मोठ्या क्षेत्रावर एकाच वेळी फवारणी करता येते. 
  • टाकीची क्षमता- २०० लिटर. 
  • वापरास सोईस्कर आणि यासाठी कुशल कामगाराची फारशी गरज पडत नाही. 
  • एका दिवसात १८ ते २० एकर फवारणी करणे शक्य.   
  • बैलचलित असल्यामुळे मोठी टाकी वापरता येते. ती अन्य टाक्यांप्रमाणे वारंवार भरण्याची गरज पडत नाही. वेळेची बचत होते. 
  • फर्टिलायझर ब्रॉडकास्टर (मनुष्यचलित)

  • पिकांना खते देण्यासाठी उपयुक्त यंत्र. 
  • वजनाने हलके असून, हाताळण्यास सोईस्कर आहे 
  • खताचे वितरण योग्य प्रमाणात, वेगाने व साठी, सुलभतेने करण्यास योग्य आहे. 
  • स्वयंचलित फवारणी यंत्र (क्राउलर टाइप)

  • विद्यापीठामध्ये या यंत्राची प्रक्षेत्रीय चाचणी घेण्यात आलेली आहे. 
  • हे यंत्र फळबागेसाठी विशेषतः द्राक्ष बागेसाठी पावसाळ्यात म्हणजेच बागेत पाणी साचलेले असताना फवारणी करण्यासाठी उपयुक्त आहे.
  • हे यंत्र स्वयंचलित असून, १८ अश्‍वशक्तीचे डिझेल इंजिन आहे. 
  • या यंत्रामध्ये ईएसएस (इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेयर) संरचना दिलेली आहे. 
  • टाकीची क्षमता ४०० लिटर आहे. 
  • फवारणी क्षमता १५ फूट पर्यंत आहे. 
  • वळण त्रिज्या कमी असल्याने दोन ओळींमध्ये  सहज व प्रभावीरीत्या फवारणी करता येते. 
  • ट्रॅक्टरचलित इलेक्टोस्टॅटिक स्प्रेअर (ईएसएस)

  • ४५ ते ५० अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.  
  • पीटीओद्वारे ऊर्जा दिली जाते.
  • टाकी क्षमता - २१२ पासून ते ५६८ लिटर. 
  • फवारणी क्षमता- २.८८ ते ५.०३ लिटर प्रति मिनीट
  • अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रेयर ४० मायक्रॉन पाण्याच्या थेंबांचा आकार. त्यामुळे लहान पाणी कणांद्वारे रसायने कार्यक्षम आणि प्रभावीरीत्या पानांपर्यंत पोहोचवली जातात. 
  • द्राक्षे बागेसाठी अतिशय उपयुक्त. 
  • डॉ. तुळशीदास बास्टेवाड,   ९४२३३४२९४१ (प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

    Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

    Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

    Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

    Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

    SCROLL FOR NEXT