सुनील चावकेपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यातही प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसला चौथ्यांदा विजयी करण्यात यश मिळविल्यास २०२९च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी बहुतांश विरोधी पक्ष ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे..India Elections: सत्तेच्या आधाराने शाबूत असलेल्या तीन मोठ्या प्रादेशिक पक्षांना पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकांच्या अग्निदिव्यातून जावे लागणार आहे. देशभरात सतत डळमळीत होत चाललेला प्रादेशिक पक्षांचा पाया टिकवून ठेवण्याचे आव्हान तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि डाव्या आघाडीपुढे असेल..Rajya Sabha Elections 2026: राज्यसभेसाठी भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवलेंना उमेदवारी, यादीत दोन नवे चेहरे.मे २०१४ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान साडेअकरा वर्षांमध्ये तीन लोकसभा निवडणुकांव्यतिरिक्त एकूण ७२ राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-रालोआने ३९ वेळा विजय मिळवून सत्ता संपादन केली, तर प्रादेशिक पक्षांनी १७ वेळा विजयांची नोंद करीत सत्ता मिळविली. काँग्रेसप्रणीत आघाडीने १६ वेळा विजय मिळविले.म्हणजे भाजप-रालोआ आघाडीने ३९ वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या, तर भाजपविरोधी पक्षांनी ३३ वेळा. २०१८ मध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगढ ही भाजपच्या वर्चस्वाची राज्ये जिंकणाऱ्या काँग्रेसने सर्वांत चमकदार कामगिरी बजावली. पण त्यानंतर काँग्रेसला केवळ कर्नाटक, तेलंगण आणि हिमाचल प्रदेशात स्वबळावर सत्ता मिळविणे शक्य झाले आहे..पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या ताज्या फेरीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, केरळमध्ये माकपच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी आणि तमिळनाडूमध्ये द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला अग्निदिव्याला सामोरे जायचे आहे. महाराष्ट्रातील दुभंगलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल, के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्रसमिती, जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस, जे. जयललितांच्या पश्चात अण्णा द्रमुक, मायावतींचा बसप, लालूप्रसाद-तेजस्वी यादव यांचा राजद, मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी यांसारख्या देशातील प्रस्थापित प्रादेशिक पक्षांना घरघर लागून त्यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिहारमध्येही गेल्या वीस वर्षांपासून सत्तेत असलेल्या नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला ८४ आमदारांचे घसघशीत संख्याबळ असूनही भाजपच्या सौजन्याने ग्रहण लागले आहे..Cooperative Society Elections: राज्यातील ११,०४१ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील; प्राधिकरणाचा आदेश.या पार्श्वभूमीवर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि माकपप्रणीत डावी आघाडी या तीन प्रादेशिक पक्षांसमोर अस्तित्वाचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यांच्याविरोधात भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ व्हावा म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरवलोकनाची (एसआयआर) मोहीम राबवून तमिळनाडूतील सुमारे ७४ लाख, पश्चिम बंगालमधील सुमारे ६४ लाख आणि केरळमधील सुमारे नऊ लाख मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून हटविली आहेत..पश्चिम बंगालमध्ये सलग तीन विधानसभा निवडणुका दणदणीत फरकाने जिंकणाऱ्या तृणमूल काँँग्रेसला पुन्हा एकदा आक्रमक भाजपचे आव्हान परतावून लावायचे आहे. ‘तृणमूल’च्या विरोधात वितळून शून्य झालेला माकप आणि काँग्रेसचा उरलासुरला जनाधार भाजपला जाऊन मिळण्याच्या शक्यतेमुळे यंदा थेट लढत होणार आहे.भाजपने ही निवडणूक जिंकली तर आजच्या घडीला देशातील सर्वांत मोठ्या प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व संपुष्टात येणार आहे. ही निवडणूक नाही जिंकली तरी या वेळी तृणमूल काँग्रेसविरुद्ध शंभरी पार करण्याची संधी थेट लढतीमुळे भाजपला मिळणार आहे. त्यामुळे यंदा पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक सर्वात उत्कंठावर्धक ठरणार आहे..Zilla Parishad Panchayat Samiti Elections Results Live: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच सर्वात मोठा- मुख्यमंत्री फडणवीस.तमिळनाडूमध्ये द्रमुकविरुद्ध अण्णा द्रमुक अशा थेट लढतीचे पर्व यावेळी संपण्याची चिन्हे आहेत. अभिनेते विजय यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच उतरणारा ‘तामीलगा वेट्री कळघम’ पक्ष १०-१५ टक्के मतांपर्यंत मुसंडी मारून भाजपशी स्पर्धा करू पाहत आहे.पण अण्णा द्रमुकचा पाया खिळखिळा झाल्यामुळे द्रमुकला फायदा होऊ शकतो. केरळमध्ये दर पाच वर्षांनंतर होणाऱ्या सत्तांतराची चार दशकांची परंपरा मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या सरकारने संपुष्टात आणली ती काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे..देशात ज्या एक-दोन राज्यांमध्ये काँग्रेसची पक्षसंघटना शाबूत आहे, त्यात केरळचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये लोकसभेत वायनाडचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्या नेतृत्वाची या वेळी कसोटी लागणार आहे.केरळमध्ये काँग्रेसला विजयन यांची हॅटट्रिक रोखण्यात यश आले नाही, तर केवळ काँग्रेसच्या समस्याच वाढणार नाहीत, तर केरळमध्ये पुढच्या निवडणुकीत डाव्या आघाडीसह काँग्रेसचे वर्चस्व संपविण्याची भाजपला आयती संधी मिळणार आहे..Local Body Elections: परभणीत ‘झेडपी’, पंचायत समितीसाठी आज मतदान.भिस्त आसाम आणि पश्चिम बंगालवरकेरळप्रमाणेच आसाममध्येही लागोपाठ दोन वेळा सत्तेत आलेल्या भाजपला पराभूत करण्यासाठी गौरव गोगोईंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांच्या आक्रमकतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे पाठबळ लाभल्यामुळे आसामात भाजपपुढे काँग्रेसचा निभाव लागणे कठीण आहे. आसाम खिशात असलेल्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पूर्ण ताकद लावायची आहे. केरळ किंवा तमिळनाडूमध्ये २०३२ ची निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून पाया भक्कम करण्यावर भाजपचा भर असेल..म्हणजे भाजपची भिस्त आसाम आणि पश्चिम बंगालवर, तर काँग्रेसला केरळ आणि आसामकडून आशा असेल. दोन राष्ट्रीय पक्षांच्या आक्रमणात तृणमूल काँग्रेस आणि माकपप्रणीत डाव्या आघाडीपुढे अस्तित्व टिकवून ठेवावे लागणार आहे. सध्याचा ट्रेंड लक्षात घेतला, तर तमिळनाडूमध्ये एम.के. स्टालिन यांच्या द्रमुकला, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आणि त्यापाठोपाठ पिनराई विजयन यांच्या माकपला पुन्हा सत्तेत परतण्याची संधी आहे. भाजपला आसाममध्ये विजयांची हॅटट्रिक नोंदविण्यापासून रोखण्याचे सामर्थ्य काँग्रेसप्रणीत आघाडीमध्ये दिसत नाही. पुद्दुचेरीमध्ये भाजप-रालोआची द्रमुक आघाडीशी बरोबरीची टक्कर असेल..आसाम आणि केरळच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पराभूत झाल्यास राहुल गांधी यांचा राष्ट्रव्यापी प्रभाव क्षीण होईल आणि त्याच वेळी ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसला चौथ्यांदा विजयी करण्यात यश मिळविल्यास राहुल गांधींच्या जागी पंतप्रधान मोदी यांना २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत आव्हान देण्यासाठी बहुतांश विरोधी पक्ष ममता बनर्जींना पाठिंबा देतील. त्यामुळे अनेक अर्थांनी पाच राज्यांतील निवडणुका देशाच्या राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.