एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या उत्पादनासाठी दुहेरी जोड कलम पद्धती 
टेक्नोवन

एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या उत्पादनासाठी दुहेरी जोड कलम पद्धती

वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेमध्ये एकाच खुंटरोपावर वांगी आणि टोमॅटोचे दुहेरी जोड कलम करून दोन्ही फळभाज्यांचे एकाच वेळी उत्पादन घेण्याचा प्रयोग करण्यात आला. या झाडास ‘ब्रिमॅटो’ असे नाव देण्यात आले आहे.

टीम अॅग्रोवन

वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेमध्ये एकाच खुंटरोपावर वांगी आणि टोमॅटोचे दुहेरी जोड कलम करून दोन्ही फळभाज्यांचे एकाच वेळी उत्पादन घेण्याचा प्रयोग करण्यात आला. या झाडास ‘ब्रिमॅटो’ असे नाव देण्यात आले आहे. याआधी याच पद्धतीने कलम करून एकाच झाडापासून बटाटा आणि टोमॅटोचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. त्यास ‘पोमॅटो’ असे नाव दिले होते. अधिक उत्पादनाव्यतिरिक्त भाज्यांमध्ये जैविक आणि अजैविक ताणासाठी सहनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने दुहेरी जोड कलम ही पद्धत अधिक उपयुक्त ठरू शकते. या पद्धतीमध्ये एकाच कुळातील २ किंवा त्यापेक्षा जास्त कलम काड्यांचा वापर करून एकाच झाडापासून एकापेक्षा जास्त भाज्यांचे उत्पादन घेणे शक्य आहे. कलम बांधणीसाठी वाण निवड ः वांग्याचे संकरित वाण ‘काशी संदेश’ आणि टोमॅटोचे सुधारित वाण ‘काशी अमन’ यांची कलम काडी म्हणून निवड करण्यात आली. खुंट काडीकरिता आयसी १११०५६ (IC १११०५६) या वांगी वाणाचा वापर करण्यात आला. या खुंट जातीमध्ये दोन फांद्या विकसित करण्याची क्षमता ही ५ टक्क्याइतकी आहे. या २ फांद्यावर वेगवेगळे दोन कलम बांधणे शक्य होते. असे केले कलम ः

  •  या कलम काडी काढणीसाठी वांग्‍याची २५ ते ३० दिवसांची आणि टोमॅटोची २२ ते २५ दिवसांची रोपे निवडण्यात आली. टोमॅटो आणि वांग्याची कलम काडी काढून, त्यांचे वांग्याच्या ‘आयसी १११०५६’ या जातीच्या खुंटरोपावर जोड कलम पद्धतीने कलम बांधण्यात आले.
  •  कलम काडी आणि खुंट रोपावर ५ ते ७ मिमी लांबीचा तिरकस (४५ अंशाचा) छेद घेऊन जोड पद्धतीने कलम बांधण्यात आले.
  •  कलम बांधणी केलेली रोपे शेडनेटमध्ये नियंत्रित वातावरणात ठेवण्यात आली. सुरवातीचे १५ दिवस तापमान, आर्द्रता आणि नव्या कलमाला झेपेल इतक्या प्रकाशात ठेवण्यात आले.
  •  कलम बांधणीनंतर १५ ते १८ दिवसांनी शेतामध्ये रोपांची पुनर्लागवड करण्यात आली.
  •  वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत दोन्ही कलम काड्यांची समान वाढ होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले. कलम बांधणीच्या खाली खुंटरोपावर वाढणारे फुटवे त्वरित काढून टाकले.
  •  शेतामध्ये कलम केलेल्या रोपांना २५ टन कंपोस्टखत, नत्र, स्फुरद आणि पालाश १५०:६०:१०० किलो प्रति हेक्टर या प्रमाणे मात्रा देण्यात आली.
  •  साधारणपणे लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांनी वांगी आणि टोमॅटोमध्ये फळधारणा होण्यास सुरवात झाली.
  • उत्पादन ः सरासरी एका झाडापासून टोमॅटोची ३६ फळे (२.३८३ किलो) आणि वांग्याची ९.२ फळांचे (२.६८४ किलो) उत्पादन मिळाले. दुहेरी जोड कलम पद्धतीने विकसित केलेले ‘ब्रिमॅटो’ हे कमी जागा असलेल्या ठिकाणी लागवडीस योग्य आहे. शहरांमध्ये व्हर्टिकल गार्डन ( मजल्याची उभी शेती) किंवा पॉट कल्चरमध्ये लागवडीसाठी हे तंत्र अधिक उपयोगी ठरू शकते. व्यावसायिक पद्धतीने ‘ब्रिमॅटो’चे उत्पादन घेण्यासंदर्भात वाराणसी येथील आयसीएआर-भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेमध्ये संशोधन चालू आहे. (स्रोत ः आयसीएआर-भारतीय भाजीपाला संशोधन संस्था, वाराणसी, उत्तर प्रदेश)  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

    Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

    Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

    Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

    Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

    SCROLL FOR NEXT