हरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण उत्पादनवाढीसाठी फायद्याचे 
टेक्नोवन

हरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण उत्पादनवाढीसाठी फायद्याचे

वृत्तसेवा

हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक सेन्सर आणि स्पेक्ट्रोमीटर बाजारात उपलब्ध होत आहेत. उत्पादनवाढीसाठी परदेशामध्ये याचा वापर काही प्रमाणात सुरू झाला आहे. भारतातही भविष्यातील अत्याधुनिक प्रकाश योजना आणि त्यावरील नियंत्रणातून उत्पादनवाढीसाठी अधिक संशोधन होणे अपेक्षित आहे. व्यावसायिक हरितगृहाच्या कार्यक्षमतेमध्ये प्रकाशाचे व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. योग्य दर्जाच्या प्रकाश उपलब्ध करून देण्यासाठी लि- कोर बायोसायन्सेस या खासगी कंपनीने खास स्पेक्ट्रोमीटर बाजारात आणला आहे. त्याद्वारे प्रकाशाचे विविध स्पेक्ट्रम मोजता येतात. सोबत प्रकाश सेन्सरचा वापर केल्यास उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याविषयी माहिती देताना अॅबी ब्रुक यांनी सांगितले, की वनस्पतींची वाढ आणि पुनरुत्पादन हे प्रकाश संश्लेषण कार्यक्षम किरणांवर (फोटोसिंथेटिक अॅक्टिव्ह रेडिएशन -पीएआर) अवलंबून असते. ही क्रिया प्रामुख्याने ४०० ते ७०० नॅनोमीटर दरम्यानच्या तरंगलांबीमध्ये घडते. सर्व प्रकारच्या प्रकाशामध्ये पीएआर नसतात. त्याच प्रमाणे वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पीएआरची आवश्यकताही बदलत असते. नैसर्गिक प्रकाशाची तीव्रता वेगवेगळ्या वेळी बदलत असते. मात्र कृत्रिम प्रकाश योजनेमध्ये वाढीच्या योग्य त्या टप्प्यात तीव्रता वाढवणे गरजेचे असते. नेमके केव्हा आणि किती प्रमाणात तीव्रता वाढवायची किंवा कमी करायची, याविषयी जागररूक राहणे आवश्यक आहे. अन्यथा, ऊर्जा वाया जाण्याचाच धोका अधिक आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कंपनीच्या संशोधकांनी एलआय-१९० आर क्वांटम सेन्सर (LI-१९०R Quantum Sensor) विकसित केला आहे. त्याद्वारे हरितगृहातील नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि कृत्रिम प्रकाश योजनेतील प्रकाश यातील पीएआर घटकांचे प्रमाण मोजले जाते. कृत्रिम प्रकाश योजनेतील इनकॅंडेसेंड, उच्च दाबाचे सोडिअम दिवे, उच्च तीव्रतेचे फ्लुरोसन्ट प्रकाश आणि नुकतेच बाजारात आलेले एलईडी दिवे या सर्वांचे योग्य मोजमाप शक्य होते. स्पेक्ट्रल संरचना सर्व प्रकारचे प्रकाश वनस्पतीच्या वाढ किंवा पुनरुत्पादनावर परिणाम करत नाहीत. त्यातील प्रकाश संश्लेषण कार्यक्षम किरणे ही ४०० ते ७०० नॅनोमीटर एवढीच असतात. हे प्रकाशाच्या लाल, निळा आणि हिरवा अशा तीन रंगांमध्ये विभागले जातात. त्यासोबत अतिनीलकिरणे (नीअर अल्ट्राव्हायोलेट -३८० ते ४०० नॅनोमीटर) आणि अवरक्त (फार रेड - ७०० ते ७८० नॅनोमीटर) किरणांवर वाढीच्या अवस्थेनुसार योग्य प्रमाणात नियंत्रण ठेवणे एलआय -१८० द्वारा शक्य होते. परिणामी, पिकांची वाढ उत्तम होते. यातील सेन्सर हे अत्यंत संवेदनक्षम असून, अगदी १ नॅनोमीटरपर्यंतची फोटॉन फ्लक्स डेन्सिटी मोजता येते. हे सर्व घटक मोबाईल किंवा संगणकावर पाहता येतात.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT