Sugarcane Technology Agrowon
टेक्नोवन

Sugarcane Technology : ऊस तंत्रज्ञानासाठी ‘सिंधुरत्न’कडे ५४ लाखांचा प्रस्ताव

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले असले तरी एकरी उत्पादन १५ ते ३० टन इतकेच राहिले आहे.

Team Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः नापणे ऊस संशोधन केंद्रांच्या (Sugarcane Research Centre) माध्यमातून एक डोळा ऊस रोप (Sugarcane Plant Technique) तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना माफक दरात ऊस रोपे उपलब्ध करून देण्यासाठी ५४ लाख ४७ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. संशोधन केंद्रांकडून हा प्रस्ताव सिंधुरत्न समृद्धी योजना समितीकडे (Sindhuratn Samrudhhi Yojana) पाठविण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र झपाट्याने (Sugarcane Acreage) वाढले असले तरी एकरी उत्पादन १५ ते ३० टन इतकेच राहिले आहे.

उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नाही. परंतु नापणे ऊस संशोधन केंद्राला मंजुरी मिळाल्यापासून या केंद्रांचे पथक सातत्याने ऊस रोपे, लागवड, (Sugarcane Cultivation) स्थानिक पातळीवर होणाऱ्या ऊस जातीचा प्रचार, प्रसार करण्याचे काम करीत आहे.

अधिक उत्पादन मिळण्यासाठी रोपनिर्मिती खूप महत्त्वाची असते. त्यामुळे फोंडाघाट प्रक्षेत्रावर गेल्या तीन वर्षांपासून एक डोळा रोप निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करून रोपनिर्मिती केली जाते.

परंतु हे काम करीत असताना आवश्यक अनुदान कोणत्याच योजनेतून मिळत नसल्यामुळे तंत्रज्ञान विकसित करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

त्यामुळे ‘सिंधुरत्न समृद्धी’तून एका डोळा ऊस रोप तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचा प्रचार, प्रसार करणे या कामाला व्यापक स्वरूप देण्यासाठी ५४ लाख ४७ हजारांचा निधी तीन वर्षांत टप्प्याटप्पाने मिळावा, अशी मागणी संशोधन केंद्राकडून करण्यात आली आहे.

एक डोळा ऊस रोप तंत्रज्ञान विकसित करून त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाली तर मोठ्या प्रमाणात रोपनिर्मिती करून ती रोपे शेतकऱ्यांना माफक दरात देता येतील.
डॉ. विजय शेट्ये, प्रकल्प अधिकारी, ऊस संशोधन केंद्र, नापणे
नापणे ऊस संशोधन केंद्राकडून प्रस्ताव आलेला आहे. परंतु सध्या आचारसंहिता असल्यामुळे समितीची बैठक झालेली नाही; मात्र आचारसंहिता संपताच ही बैठक होईल. त्यात सकारात्मक निर्णय होईल.
प्रमोद जठार, माजी आमदार तथा सदस्य, सिंधुरत्न समृद्धी योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT