Irrigation Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Irrigation : ‘प्रकाशा-बुराई’ला प्रशासकीय मंजुरी कधी?

Irrigation Scheme : पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी वाया न जाता ते पाणी प्रकल्पामध्ये टाकून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचेल यासाठी प्रकाशा-बुराई उपसासिंचन योजना आखण्यात आली आहे.

Team Agrowon

Dhule News : तापी नदीवर झालेल्या बॅरेजेसमुळे खूप मोठा पाण्याचा साठा पावसाळ्यात समुद्रात वाहून जातो. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी वाया न जाता ते पाणी प्रकल्पामध्ये टाकून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचेल यासाठी प्रकाशा-बुराई उपसासिंचन योजना आखण्यात आली आहे. योजना मंजूर झाली तेव्हा ११० कोटी रुपये तर चक्क तीनपट म्हणजे ५५० कोटी रुपये खर्च होणार आहे.

शिंदखेडा, साक्री व नंदुरबार तालुक्यातील सुमारे सात हजार ८५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना १९९९ मध्ये सुमारे ११० कोटी रुपयांची योजना तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात मंजूर करण्यात आली होती; परंतु त्यानंतर आलेल्या आघाडी शासनामुळे ही योजना बारगळली.

त्यानंतर २०१४ मध्ये राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन कॅबिनेट व नंदुरबार जिल्ह्यांचे पालकमंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या सततच्या पाठपुराव्याने या योजनेला मोठी गती मिळाली होती; परंतु त्यानंतर २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि पुन्हा ही योजनेचे काम ‘कासवगती’ने सुरू झाले होते. आता या योजनेसाठी सुमारे ५५० कोटी रुपयांची गरज आहे.

शिंदखेडा, साक्री व नंदुरबार तालुक्याची महत्त्वाकांशी योजना शिंदखेडा तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी म्हणल्या जाणाऱ्या मतदारसंघासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाकांशी आहे. शिंदखेडा, साक्री व नंदुरबार तालुक्यातील एकूण सात हजार ८५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या सिंचन योजनेचा फायदा नंदुरबार, शिंदखेडा व साक्री तालुक्यांना होईल.

अशी आहे योजना...

प्रकाशा बॅरेजेसच्या बुडीत क्षेत्रातून पावसाळ्यात पुराचे पाणी वाहून जाते, हे वाहून जाणारे पाणी हाटमोहिदा (ता. नंदुरबार) गावशिवारातील तापी नदीवर इनटेक चॅनेल व जॅकवेल बांधून उपसाद्वारे पाणी उचलून पाइपद्वारे पहिल्या टप्प्यात निंभेल (ता. नंदुरबार) येथील साठवण बंधाऱ्यात सोडणे, दुसऱ्या टप्प्यात असाणे (ता. नंदुरबार) येथील साठवण बंधाऱ्यात सोडण्यात येणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात शनिमांडळ (ता. नंदुरबार) येथील साठवण बंधाऱ्यात सोडण्यात येणार आहे. पुढे मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती मध्यम प्रकल्पात टाकण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यात बुराई (ता. साक्री) मध्यम प्रकल्पात टाकण्यात येऊन ते वाडी-शेवाडी (ता. शिंदखेडा) मध्य प्रकल्पातून थेट ते सुलवाडेजवळ पुन्हा तापी नदीला मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

Farmer Suicide : चिंतन शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचे

Soybean Procurement Issue : सोयाबीन खरेदीचा तिढा

Green Energy Investment : हरित ऊर्जेमधील गुंतवणूक २५ लाख कोटींवर जाणार

Alandi Kartiki Ekadashi : आळंदीत उद्यापासून माउलींचा संजीवन समाधी सोहळा

SCROLL FOR NEXT