Irrigation Scheme : सिंचन योजनांसाठी २४ टीएमसी पाणीउपसा

Tembhu, Takari, Mhaisal Irrigation Update : टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांसाठी यावर्षी आतापर्यंत २४ टीएमसी पाणीउपसा करण्यात आला आहे. नदीवरील उपसा सिंचन योजनांनी २१ टीएमसी इतके पाणी उचलले आहे.
Irrigation scheme
Irrigation schemeAgrowon

Sangli Irrigation News : टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांसाठी यावर्षी आतापर्यंत २४ टीएमसी पाणीउपसा करण्यात आला आहे. नदीवरील उपसा सिंचन योजनांनी २१ टीएमसी इतके पाणी उचलले आहे.

वारणा आणि कोयना धरणात सध्या एकूण २० टीएमसी पाणीसाठा असला जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने चिंता वाढली आहे. पाण्याचे काटेकोर नियोजन करा, पाणी जपून वापरा, फक्त उभी पिके जगवा आणि सूक्ष्म सिंचन योजनांवर भर द्या, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

Irrigation scheme
Agriculture Irrigation : डिंभे धरणातून उजव्या, डाव्या कालव्याला पाणी सोडले

जूनच्या अखेरच्या आठवड्यात मंगळवारी (ता. २७) जिल्ह्यात हलका पाऊस झाला. यंदा उन्हाळी पाऊस क्वचितच झाला. परिणामी, खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या जिल्ह्यात हंगाम संकटात येण्याची भीती आहे. अशावेळी धरणांतील पाणीसाठ्याचा जपून वापर करावा, यासाठी पाटबंधारेकडून नियोजन करण्यात आले.

यावर्षी टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालवल्या गेल्या. अखेरच्या टप्प्यात तर शेतकऱ्यांनी पाणी सोडा, असे आवाहन करत पाणीपट्टी स्वतः वसूल केली आणि पाटबंधारे विभागाकडे भरली. त्यामुळे योजना चालवली गेली.

असा झाला पाणीउपसा

टेंभू - १२ टीएमसी

ताकारी- ४.८५ टीएमसी

म्हैसाळ- ७.४० टीएमसी

नदीवरील योजना - २१ टीएमसी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com