Crop Damage Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीक नुकसानीबाबत तीन लाख दावे दाखल

नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. या बाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे वैयक्तिक दावे दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे नुकसान (Kharif Crop Damage) झाले आहे. या बाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे वैयक्तिक दावे (Crop Damage Claim Filed) दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. यामुळे जिल्ह्यातून ऑफलाइन तसेच ऑनलाइन दोन लाख ८२ हजार दावे दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

जिल्ह्यात जुले, ऑगस्ट तसेच सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागांत झाल्यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यातील अनेक मंडलांत एकापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टी नोंदली गेली. जोरदार झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला.

यात नदीकाठची पिके खरडून गेली. तर काही ठिकाणी पाणी साचून पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीत जिल्ह्यातील सात लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे सव्वा पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने शासनाकडे पाठविली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे वैयक्तिक दावे दाखल करण्याचे, आवाहन प्रशासनाने केले होते.

यामुळे जिल्ह्यातून पोर्टलवर दोन लाख ५५ हजार ६५, ई-मेलद्वारे १२ हजार ८८४, तर टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून १४ हजार ९७६ असे एकूण दोन लाख ८२ हजार ९२५ दावे दाखल झाले आहेत.

अर्ज आलेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचे काम मात्र संथ गतीने चालू आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ६० हजार ५९१ दाव्यांबाबत पंचनामे झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली. दरम्यान, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्राप्त दाव्याचे त्वरित पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT