Crop Damage Compensation
Crop Damage Compensation  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : कृषी आयुक्तांच्या आदेशालाही तिलांजली

टीम ॲग्रोवन

अमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान (Crop Damage) झालेल्या व पूर्वसूचना (Crop Damage Intimation) दाखल करणाऱ्या १६ हजार ५५८ शेतकऱ्यांना विमा कंपनीने (Crop Insurance Company) अपात्र ठरविले आहे. त्यांचे सर्व्हेक्षण करण्याच्या कृषी आयुक्तांच्या आदेशालाही विमा कंपनीने ठेंगा दाखवत नकारघंटा कायम ठेवली आहे. आदेश असताना एकाही प्रकरणात कंपनीकडून सर्व्हेक्षण करण्यात आलेले नाही.

यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ९८६ शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. यातील १६ हजार ५५० सूचना कंपनीने अपात्र ठरविल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने पाहणी करून पीकविमा परतावा मिळावा यासाठी दाखल झालेल्या एकूण पूर्वसूचनांपैकी ९० हजार ६५२ पूर्वसूचनांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. ३३ हजार ३३४ प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. याशिवाय कारणे दाखवत विमा कंपनीने १६ हजार ५५८ प्रकरणे अपात्र ठरविली आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ७२ तासांत सूचना दाखल करणे आवश्यक असले तरी त्याऐवजी १० दिवसांचा अवधी गृहीत धरण्यात यावा व अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी व कृषी आयुक्तांनी दिले आहेत. मात्र या आदेशावरही विमा कंपनीने नकारघंटा कायम ठेवत एकाही प्रकरणात सर्व्हेक्षण केलेले नाही.

खरीप हंगामात जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे जिल्ह्यातील ३ लाख हेक्टर क्षेत्रातील मूग, उडीद, सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकाला अधिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील ८४ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.

अपात्र ठरविलेल्या तक्रारी

अमरावती १३५३, अचलपूर ३९६, अंजनगावसुर्जी ५६९, भातकुली १४८३, चांदूररेल्वे १३१३, चांदूरबाजार ३१८, धामणगावरेल्वे ११८७, धारणी ८५, मोर्शी १२७२, नांदगाव खंडेश्वर ४०९३, तिवसा १५१८, वरूड ६७७, दर्यापूर ३८०, चिखलदरा ११४.

१६५५८ शेतकऱ्यांच्या पूर्व सूचनांच्या सर्व्हेक्षणाचे आदेश आहेत. स्थानिक प्रशासनाने वारंवार पाठपुरावा केला. मात्र विमा कंपनीने दखल घेतली नाही. आयुक्तालयाने देखील सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशाला ही कंपनी जुमानत नाही. या बाबत वरिष्ठांना कळविले आहे.
अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT