Crop Damage Compensation : नांदेडमधील अतिवृष्टिग्रस्तांना ३७५ कोटींचे वितरण

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शासनाच्या भरपाईचे वाटप सुरू आहे.
Crop Damage Compensation
Crop Damage Compensation Agrowon

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपाचे नुकसान (Kharif Crop Damage) झालेल्या बाधित शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शासनाच्या भरपाईचे (Crop Damage Compensation) वाटप सुरू आहे. जिल्हा बँकेला प्राप्त झालेल्या ६९१ कोटी १५ लाखांपैकी अडीच लाख शेतकऱ्यांना एटीएम व शाखेतून ३७५ कोटी ३० लाख रुपयांचे वाटप झाल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपसरव्यवस्थापक मारोतराव शिंदे यांनी दिली.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांसाठी ९३ कोटींवर निधी मंजूर

जिल्ह्यात यंदा जून ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक मंडळात एकापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टीची नोंद झाली होती. यामुळे जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मूग या पाच लाख २७ हजार १४१ हेक्टरवरील पिकांसह ३१४ हेक्टरवरील बागायती व ६६ हेक्टरवरिल फळपिके असे एकूण पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’

यात सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांना फटका बसला. या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्ह्याला ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा निधी ता. २१ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. यानंतर हा निधी लगेच सर्वच सोळा तालुक्यांना वितरित करून शेतकऱ्यांच्या याद्यानुसार जिल्हा बँकेला वितरित केला होता. यानंतर जिल्हा बँकेकडून जमा खर्च झाल्यानंतर शेतकऱ्यांना वाटप करण्याचे काम सुरू झाले.

जिल्हा बँकेला सात लाख २६ हजार ६१२ खातेदार शेतकऱ्यांसाठी ६९१ कोटी १५ लाख रुपये प्राप्त झाले होते. यातील दोन लाख ६२ हजार ३४० शेतकऱ्यांना बँकेमार्फत २६९ कोटी ७९ लाख सात हजार रुपये वाटप झाले आहेत. तर एटीएमच्या माध्यमातून एक लाख ९४ हजार ५१० खातेदारांनी १०५ कोटी ५१ लाख ३१ हजार असे एकूण ३७५ कोटी ३० लाख ३८ हजार रुपये वाटप झाल्याची माहिती श्री. मारोतराव शिंदे यांनी दिली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना लवकर रक्कम मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आजपर्यंत पावणेचारशे कोटी रुपये वितरित झाले आहेत. उर्वरित रक्कमही शेतकऱ्यांना वेळेवर मिळेल याचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे.
मारोतराव शिंदे, उपसरव्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com