E - Crop  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

E Peek Pahani : ‘ई-पीक पाहणी’ पंचनाम्यांची अट काही दिवसांसाठी शिथिल

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

टीम ॲग्रोवन

नगर ः अतिवृष्टीने नुकसान (Crop Damage) झालेल्या क्षेत्राचे पंचनामे, जलद गतीने होण्यासाठी ‘ई पीक’ पाहणी पंचनाम्याची अट काही दिवसांसाठी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची, माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली.नगर जिल्ह्यातील नुकसानीच्या पाहणीसाठी विखे पाटील यांनी जिल्हाभरात दौरे केले. दोन दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील आळकुटी, निघोज येथील ग्रामस्थांशी संवाद साधत पाहणी केली.

या वेळी विखे पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांकडून पंचनाम्यासंदर्भात येत असलेल्या तक्रारींची दखल घेऊन ‘ई-पीक पाहणी’ पंचनाम्याची अट काही दिवसांकरिता शिथिल करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. अनेक ठिकाणी रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांकडे अॅन्डरॉईड मोबाईल नाहीत.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पंचनामे होतील की नाही अशी भीती असून या संकटात पंचनाम्याच्या बाबतीत कोणतीही त्रुटी राहू नयेत म्हणून, सरसकट पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासन निश्चितपणे घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यापूर्वी आलेल्या नैसर्गिक संकटातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत देऊन दिलासा दिला आहे.

मदतीचा निर्णय करताना दोन हेक्टरची अट शिथिल करून तीन हेक्टरपर्यंत त्याची मर्यादा वाढवली असून मदतीच्या रकमेतही पहिल्यांदाच वाढ करण्यात आली असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. सुनील तुंबारे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT