E Peek Pahana : ‘ई-पीक’वर २ लाख हेक्टर पिकांची नोंद

यंदाच्या (२०२२) खरीप हंगामात गुरुवार (ता. १३) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ५ लाख ३३ हजार ८०४ पैकी २ लाख २४ हजार ८७० शेतकरी खातेदांरानी (४२.१३ टक्के) २ लाख ८२ हजार ५००.५३ हेक्टर (४६.५२) एवढ्या क्षेत्रांवरील पीक पेऱ्याची नोंद ई-पीक अॅपद्वारे केली आहे.
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon
Published on
Updated on

परभणी ः यंदाच्या (२०२२) खरीप हंगामात (Kharip Season) गुरुवार (ता. १३) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ५ लाख ३३ हजार ८०४ पैकी २ लाख २४ हजार ८७० शेतकरी खातेदांरानी (४२.१३ टक्के) २ लाख ८२ हजार ५००.५३ हेक्टर (४६.५२) एवढ्या क्षेत्रांवरील पीक पेऱ्याची नोंद ई-पीक अॅपद्वारे (E - Crop App) केली आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांना पावसामुळे ई-पीक पाहणी करता आलेली नाही. त्यामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीस शनिवार (ता. २२) मुदतवाढ देण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये एकूण ५ लाख ३३ हजार ८०४ शेतकरी खातेदार असून, शेती खात्यांचे एकूण क्षेत्र ६ लाख ७ हजार २७० हेक्टर आहे. यंदाच्या खरिपातील पेरणी क्षेत्र ५ लाख १० हजार ७२४ हेक्टर आहे. गुरुवार (ता. १३) पर्यंत २ लाख २४ हजार ८७० शेतकरी खातेदारांनी एकूण २ लाख ८६ हजार ३७०.७४ हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी केली आहे.

E Peek Pahani
Soybean Crop Damage : ‘हाती येता येता झाली सोयाबीनची माती’

त्यात २ लाख ८२ हजार ५००.५३ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पीकपेरा आहे. एकूण २ हजार ६४६.१० हेक्टर क्षेत्र कायम पड आहे तर चालू पड क्षेत्र १ हजार २२४.११ हेक्टर आहे. जिल्ह्यातील ई-पीकपाहणी करणाऱ्या शेतकरी खातेदारांचे प्रमाण सर्वांत कमी पाथरी तालुक्यात ३१.४५ टक्के, तसेच क्षेत्राचे प्रमाण ३४.१३ टक्के आहे. पालम तालुक्यात सर्वाधिक ५०.८२ टक्के शेतकरी खातेदार आणि ५५.६८ टक्के क्षेत्राची ई-पीकपाहणी झाली आहे.

यंदा ई-पीकपाहणी मोबाईल अॅपचे २.०.४ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअर उपलब्ध आहे. शेतकरी स्तरावर मोबाईल अॅपद्वारे प्रत्यक्ष ई-पाहणी करण्यासाठी शनिवार (ता. १५) पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु उशिराच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांना अद्याप ई-पीकपाहणी पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे जमाबंदी आयुक्तांनी शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणीसाठी शनिवार (ता. २२) पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणीचा कालावधीत २३ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२२ साठी करण्यात येत आहे. ई-पीकपाहणीसाठी ही अंतिम मुदतवाढ असल्याने जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी यांनी या बाबत सर्व शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रचार प्रसिद्धी करावी, असे निर्देश ई-पीकपाहणी प्रकल्पाच्या राज्य समन्वकांकडून देण्यात आले आहेत.

म्हणून ई-पीकपाहणी कमी....

अनेक भागांत इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची इच्छा असूनही ई-पीकपाहणीसाठी अडचणी येत आहेत. सर्व संबंधितांकडून पुरेशा प्रचार प्रसिद्धीअभावी अजूनही असंख्य शेतकरी ई-पीकपाहणी बाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ई-पीकपाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे.

तालुकानिहाय ई-पीकपाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका एकूण शेतकरी खातेदार एकूण क्षेत्र ई-पीकपाहणी खातेदार ई-पीकपाहणी क्षेत्र

परभणी ९३५३९ ११०३९७.७७ ४१५४६ ५४९३०.७०

जिंतूर ९०१४२ ११९१६३.२४ ३११२२ ४२१०६.२४

सेलू ५५३४० ६७६०४.५९ २४८५५ ३२१०३.४३

मानवत ३८६६१ ४८१४३.१७ १८७२१ २५६८०.९५

पाथरी ४४१४५ ५२९३८.२१ १३८८४ १८०६८.४१

सोनपेठ ३२०२३ ३६९५४.७२ १५८२६ २०३९८.३२

गंगाखेड ७०६४१ ६३३३१.२८ २७४७८ ३२१७१.३३

पालम ४७८७१ ४७९८३.६३ २४३३० २६७१६.३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com