Farm Pond
Farm Pond Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Irrigation Scheme : ‘सिंचन योजने’तून सोलापूरला मिळणार ७०० वैयक्तिक शेततळी

Team Agrowon

Agriculture Irrigation Scheme कोरोना काळात निधीची अडचण असल्याने मागेल त्याला शेततळे योजना (Farm Pond Scheme) बंद झाली होती. ती आता ‘‘मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजना’’ (Irrigation Scheme) या नावाने पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ६९० शेतकऱ्यांना येत्या वर्षभरात शेततळी देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्या आले आहे.

या योजनेतून आधी ३० × ३० × ३ मीटर आकारमानासाठी जास्तीत जास्त रु. ५०,०००/- पर्यंत अनुदान मिळायचे ते आता जास्तीत जास्त रु. ७५,०००/- रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. जिल्हा स्तरावरून शेततळ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.

गावातील दुष्काळी भागात उन्हाळ्यात अथवा टंचाईच्या काळात कमी पाण्यात पीक घेता यावे, उभी असलेली पिके जगवता यावी यासाठी कृषी विभागामार्फत ही योजना राबवली जात असून, या योजनेतून शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे करण्यासाठी अनुदान दिले जाते.

या योजनेतून वैयक्तिक शेततळे घेण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त होत असून, त्याप्रमाणे मंजुरी देण्याचे काम चालू आहे. नव्याने सुरू झालेल्या योजनेतून कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

मागेल त्याला शेततळे ही योजना बंद असल्याने शेततळे करण्यासाठी अनेक शेतकरी सातत्याने विचारणा करत होते. आता ही योजना सुरू झाल्याने शेतकऱ्यांची अडचण दूर झाली आहे. दुष्काळी भागात संरक्षित सिंचनसाठा म्हणून शेतकऱ्यांना शेततळ्याचा आधार मिळालेला आहे .

- आर. एस. माळी, तालुका कृषी अधिकारी, दक्षिण सोलपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT