Pomegranate Insurance Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Pomegranate Insurance Scheme : डाळिंब फळपीक विमा योजना

Pomegranate Update : सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदविलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.

विनयकुमार आवटे

Pomegranate Market : मृग बहार-२०२३ मध्ये डाळिंब फळपिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदविलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.

डाळिंब पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) विमा संरक्षण प्रदान होईल. डाळिंब बाग वय वर्ष २ पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेस विमा संरक्षण राहील.

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) - - विमा संरक्षण कालावधी- प्रमाणके (ट्रीगर) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर)

पावसाचा खंड - १५ जुलै ते १५ -

ऑगस्ट सलग २० दिवस पावसात खंड राहिल्यास रु. ५९००/-

सलग २१ ते २५ दिवस पावसात खंड राहिल्यास रु. ११,८००/-

सलग २५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसात खंड राहिल्यास रु. १७,७००/-

पावसाचा खंड- १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर

सलग २० दिवस पावसात खंड राहिल्यास रु. १७,२००/-

सलग २१ ते २५ दिवस पावसात खंड राहिल्यास रु. २९,०००/-

सलग २५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसात खंड राहिल्यास रु. ४१,३००/-

जास्त पाऊस

१६ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर एका दिवसात ४५ मि.मी. ते ६० मि.मी. पाऊस पडल्यास रु. ११,८००/-

एका दिवसात ६० मि.मी. ते ९० मि.मी. पाऊस पडल्यास रु. २९,०००/-

एका दिवसात ९० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडल्यास रु. ७१,०००/-

- विमा संरक्षण रक्कम - १,३०,००० रुपये प्रति हेक्टर

- शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता - ६५०० रुपये प्रति हेक्टर.

- या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहीत इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.

- पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

- बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबुकावरील बँक खात्याबाबतची सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी

जिल्हे - विमा कंपनीचे नाव व पत्ता

नगर, अमरावती, नाशिक, वाशीम, धुळे, सोलापूर- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली, सातारा, परभणी, जालना, लातूर - एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

बुलडाणा, जळगाव, पुणे, धाराशिव - भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड.

भाग घेण्यासाठी अंतिम तारीख - १४ जुलै, २०२३.

- अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहरासाठी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.

- एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

- शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in

-शेतकऱ्यांनी उत्पादन योग्य फळपीक नसताना विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.

- अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT