Government Scheme
Government Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Government Scheme : जत्रा शासकीय योजनांची अभियानासाठी आराखडा करा

Team Agrowon

Solapur News : शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी जत्रा शासकीय योजनांची (Government Scheme) हा उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सर्व प्रशासकीय विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत व एका ठिकाणी देण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत विविध विभागांनी योजनानिहाय उद्दिष्ट ठरवून आराखडा तयार करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी येथे केले.

जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची या अभियानाच्या पूर्वतयारी बैठकीत त्या बोलत होत्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या बैठकीस अभियानाचे जिल्हा समन्वयक जिल्हाधिकारी तुषार शिंदे, तहसीलदार अंजली कुलकर्णी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार म्हणाल्या, की राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थी उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, उद्दिष्टपूर्तीसाठी विविध विभागांच्या योजनानिहाय आराखडा तयार करावा.

जिल्हा व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात यावा. ग्राम स्तरावर काम करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका इत्यादींची बैठक घेऊन त्यांना या अभियानाची माहिती द्यावी, असे त्या म्हणाल्या. याचा समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT