Jatra Sarkari Yojnanchi : ‘जत्रा योजनांची’ अभियानाचा ७५ हजार लोकांना लाभ

‘लोक कल्याण’ हे ध्येय उराशी ठेवून शेवटच्या गरजूपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचावा या हेतूने शासकीय योजना सुलभीकरण अभियान राबविण्याचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे.
Government Scheme
Government SchemeAgrowon
Published on: 
Updated on: 

Parbahni News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शासकीय योजना सुलभीकरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचाच पहिला टप्पा म्हणून प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी विविध सरकारी योजनांचा किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.

Government Scheme
Chief Minister Eknath Shinde : वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याचे धोरण

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियानाअंतर्गत ‘जत्रा शासकीय योजनांची’ या कार्यक्रमाबाबत सोमवारी (ता. २४) आयोजित बैठकीत वडदकर हे बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री सचिवालयाचे राहुल देशपांडे आणि विकास आवटे यांची उपस्थिती होती.

वडदकर म्हणाले, की राज्य शासनाच्या सर्व योजनांची माहिती जनतेला देत त्याचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

त्यानुसार परभणी जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ‘जत्रा शासकीय योजनांची’च्या माध्यमातून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासन योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय, तालुकानिहाय नियोजन करून प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्या योजनांचा आराखडा तयार करावा. वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ या माध्यमातून दिला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com