Crop Insurance  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीकविमा योजनेत २६ लाख ५२ हजार शेतकऱ्यांचा सहभाग

Crop Insurance Scheme : राज्यातील २६ लाख ५२ हजार ५६८ शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात आपल्या पिकाचा विमा उतरवत १६ लाख ८४ हजार ४९६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.

Team Agrowon

Chhatarapati Sambhaji Nagar : राज्यातील २६ लाख ५२ हजार ५६८ शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात आपल्या पिकाचा विमा उतरवत १६ लाख ८४ हजार ४९६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.

यंदा सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने आपल्या लहरीपणाचा परिचय दिल्याने पेरण्यांचा खेळखंडोबा झाला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा उतरवण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने पेरलेल क्षेत्र विमा संरक्षित करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी चालविला आहे.

आजवर गतवर्षीच्या तुलनेत जवळपास २७.४५ टक्के क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. २०२२ च्या खरीप हंगामात ९६ लाख ६२ हजार २६१ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यंदा ११ जुलै रोजी सकाळपर्यंत २६ लाख ५२ हजार ५६८ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला आहे.

गतवर्षी विमा संरक्षित केलेल्या पीक क्षेत्राच्या तुलनेत यंदा सर्वांत कमी ६.१८ टक्के क्षेत्र कोकण विभागात विमा संरक्षित करण्यात आले असून नाशिक विभागात २६.४५ टक्के, पुणे विभागात २६.५५ टक्के, कोल्हापूर विभागात ४४.९५ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ३१.५३ टक्के, लातूर विभागात २३.५३ टक्के, अमरावती विभागात ३१.२० टक्के, तर नागपूर विभागात गतवर्षीच्या तुलनेत १८.८० टक्के क्षेत्र पीकविमा संरक्षित झाले आहे.

विमा संरक्षित क्षेत्रामध्ये कोकण विभागातील ४००६ हेक्‍टर, नाशिक विभागातील १ लाख १० हजार ९८ हेक्टर, पुणे विभागातील ७९ हजार ३७५ हेक्टर, कोल्हापूर विभागातील ९०८२ हेक्टर, छत्रपती संभाजीनगर विभागातील ४ लाख ५२ हजार ७६ हेक्टर, लातूर विभागातील ५ लाख ८१ हजार ११० हेक्टर, अमरावती विभागातील ४ लाख ९ हजार ९४२ हेक्टर, तर नागपूर विभागातील ४६ हजार ८०७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पीकविमा संरक्षणात सहभागी शेतकऱ्यांची विभागनिहाय संख्या

कोकण... ५ हजार २४३

नाशिक ...१ लाख १४ हजार ६४६

पुणे... १ लाख १४ हजार २७१

कोल्हापूर ...१५ हजार ८८३

छत्रपती संभाजीनगर ...९ लाख ९५ हजार ६९६

लातूर.... ८ लाख ५४ हजार २६३

अमरावती... ४ लाख ९६ हजार ५८९

नागपूर.... ५५ हजार ९७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Project: ‘मसलगा’च्या दुरुस्तीला वेग द्या; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Farmer Protest: शेतकरीपुत्रांचा भूम येथे रास्ता रोको

Agrowon Podcast: सिताफळाला मिळतोय उठाव; तुरीचा बाजार मंदीतच, फ्लाॅवरची आवक कमीच, लसणाचे भाव स्थिर तर मुगाचा भाव नरमला

Gokul Dairy: दूध फरक वाटपातील गोंधळामुळे ‘गोकुळ’ प्रशासन धारेवर

Farm Roads: तीन हजार पाणंद रस्त्यांच्या झाल्या नोंदी

SCROLL FOR NEXT