Crop Insurance  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance Scheme : पीक विमा योजनेत ३१ जुलैपर्यंत भाग घ्या

Kharif Crop Insurance : विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्यात पंतप्रधान पीकविमा योजना २०२६-१७ पासून राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Nashik News : विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्यात पंतप्रधान पीकविमा योजना २०२६-१७ पासून राबविण्यात येत आहे.

२०२३-२४ या वर्षात राज्यात ही योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे. त्या अनुषंगाने खरिपासाठी १ रुपयात ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

या पीक विमा योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पीक घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे विमा हप्त्याच्या ११० टक्केपर्यंत दायित्व असेल.

यापेक्षा जास्त नुकसान भरपाई शासन देणार आहे. नुकसान भरपाई विमा हप्त्याच्या ८० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास विमा कंपनी एकूण विमा हप्त्याच्या २० टक्के रक्कम स्वतः: कडे नफा म्हणून ठेवते व उर्वरित रक्कम शासनास परत करेल.

या योजनेत भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, भुईमूग, सोयाबीन, कारळा, मूग, उडीद, तूर, कापूस व कांदा या पिकांचा समावेश आहे.

योजना ओरिएंन्टल इन्शुरन्स कंपनी यांच्यामार्फत राबविली जाईल. योजनेबाबत माहितीसाठी कंपनीच्या १८००११८४८५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

पीकनिहाय रक्कम

पीक विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर)

भात ४९,५००

खरीप ज्वारी ३०,०००

बाजरी ३०,०००

नाचणी १३,७५०

मका ३५,५९८

तूर ३६,८०२

मुग २०,०००

उडीद २०,०००

भुईमूग ४२,९७१

सोयाबीन ४९,५००

कारळे १३,७५०

कापूस ४९,५००

खरीप कांदा ८१,४२२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT