Latur News  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : लातुरात पीकविमा कंपनीच्या कार्यालयात मनसेचा राडा

Crop Insurance Office Latur : संबंधित अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तर दिल्याने हा मनसे स्टाईल राडा घातल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितले आहे.

Team Agrowon

Latur News : जिल्ह्यातील एसबीआय जनरल पीकविमा कंपनीचे कार्यालयात मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. ९) चांगलाच राडा घातला. खुर्च्यांची तोडफोड करत अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. संबंधित अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तर दिल्याने हा मनसे स्टाईल राडा घातल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितले आहे.

श्री. नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बुधवारी लातूर येथे एसबीआय जनरल पीकविमा कंपनी कार्यालयात गेले होते. विमा कंपनीचे जिल्ह्यातील कार्यालय बंद आहेत, मग शेतकऱ्यांनी तक्रार देण्यासाठी जायचे कुठे याचा जाब विचारला असता एसबीआय विमा कंपनीचे व्यवस्थापक सुशीलकुमार तिवारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप मनसेने केला आहे.

लातूर जिल्ह्यात १५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने अनेक भागातील पिके सुकू लागली आहेत. जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानीसंदर्भात शेतकरी पीकविमा तालुका कार्यालयात तक्रार देण्यासाठी हेलपाटे घालत आहेत.

परंतु एसबीआय जनरल पीकविमा कंपनीची जिल्ह्यातील सर्व कार्यालये बंद असल्याने नुकसानीची तक्रार कोठे द्यावी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एसबीआय जनरल विमा कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे नुकसान होऊनही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप मनसेने केला.

या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे, जिल्हा सचिव रवी सूर्यवंशी आदी उपस्थित होते, असे नागरगोजे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT