
Akola News : नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढली आहे. ऐन हातातोंडाशी आलेले पीक गेल्या काही हंगामात हिरावून घेतले गेले. अशा संकटाच्या काळात मदतीचा हात म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांना पीकविमा फायदेशीर ठरला. त्यामुळेच यंदा पीकविमा उतरविण्याकडे कल वाढलेला दिसून आला.
जिल्ह्यात यावर्षी चार लाख ३६ हजारांवर अर्ज दाखल झाले. २ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी हे अर्ज केलेले असून ३ लाख ४२ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. शासनाने केलेल्या मुदतवाढीचाही काही अंशी फायदा झाला.
खरिपासाठी शासनाने एकात्मिक पीक संरक्षण योजना लागू केली. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात आपल्या पिकांचा विमा काढणे शक्य झाले होते. काही ठिकाणी विमा अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्र चालकांनी लुट सुरू केल्याच्याही घटना पुढे आल्या.
जिल्ह्यात दोन लाख ६ हजार शेतकरी यंदा सहभागी झाले. यात अकोला तालुक्यात ४० हजार ४९, अकोट ३२४३७, बाळापूर ३०४२६, बार्शीटाकळी २७३३१, मूर्तिजापूर २८४७१ आणि पातूर तालुक्यांतील २१ हजार १६० शेतकऱ्यांचा सहभाग होता.
तालुकानिहाय विचार केल्यास अकोला तालुक्यात सर्वाधिक ७१ हजार ५९० हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. पाठोपाठ अकोटमध्ये ५३१६९, मूर्तिजापूर ५३६३६, बाळापूर ४८३६५, बार्शीटाकळी ४२८१४, पातूर ३३२२१ हेक्टरचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी चार लाख ३६ हजार ८२१ रुपये प्रीमियम भरला आहे.
बुलडाण्यातही चांगला सहभाग
जिल्ह्यात पीकविमा काढणीला चांगला प्रतिसाद मिळाला. पीकविम्यासाठी सात लाखांवर अर्ज दाखल झाले आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, ज्वारी, मका अशा विविध पिकांचे सुमारे ५ लाख ९६ हजार हेक्टरवरील पिके संरक्षित झाली आहेत.
जवळपास चार लाख शेतकऱ्यांनी यात सहभाग दाखवला. दरवर्षी अतिवृष्टी, पूरस्थिती, दरडीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले असल्याने पीकविम्याच्या नियमानुसार २५ टक्के आगाऊ रक्कम भरपाई म्हणून देण्याची गरजही या भागातून व्यक्त होऊ लागली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.