Drought Crop Damage: मलकापूर तालुक्यातील रणथाम येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून त्यावरील कार्यवाही जलद आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच शेतातील केबल व विद्युत तारांची चोरी रोखणे, ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवणे आणि शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या..दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान बावनकुळे यांनी शेतकऱ्यांकडून पिकांची सद्यःस्थिती, शेतीतील अडचणी आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्यांची माहिती घेतली. त्यानंतर खामगाव येथील शासकीय विश्रामगृहात शेतकरी व नागरिकांची निवेदने स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या..Crop Damage Panchnamas: पंचनाम्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करा : डॉ. अशोक उईके.शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, तसेच शेतातील केबल व विद्युत तारांच्या चोरीची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत बावनकुळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासह संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या..भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक नकाशे तातडीने उपलब्ध करून द्यावेत. तसेच घरकुलांसाठी आवश्यक रेती उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांनी कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले..Banana Farm Destroyed : अज्ञाताकडून तीन एकर केळीवर तणनाशकाची फवारणी.दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी पीक व नुकसानीचे पंचनामे अचूक असणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून मदत मिळविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषांनुसार पंचनामे करावेत. ही कार्यवाही जलद, पारदर्शक आणि अचूक पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या..दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच त्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले..दुष्काळग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि उपाययोजनांच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.