Irrigation Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Irrigation : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा

जिल्ह्यात २ मोठे प्रकल्प तसेच ७ मध्यम प्रकल्प व ९० लघू प्रकल्प असे एकूण ९९ प्रकल्प पूर्ण झाले असून, यापासून ८३१.४४ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा व १,१३,५१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्मित झाली आहे.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १३,५१,६६६ हेक्टर असून लागवडी लायक क्षेत्र ९,६०,५०० हेक्टर आहे. जिल्ह्यातील लागवडीलायक क्षेत्रास सिंचनाची सुविधा (Irrigation Facility) देण्यासाठी मोठे, मध्यम व लघू प्रकल्पाची कामे जलसंपदा विभागातर्फे (Department of Water Resources) करण्यात आली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन बनसोड यांनी दिली.

जिल्ह्यातील पूर्ण व प्रगतिपथावरील प्रकल्पांची प्रकल्पीय सिंचन क्षमता ४,१८,५०३ हेक्टर पैकी २,२७,२७१ हेक्टर असून, निर्मित सिंचन क्षमता १,७२,७३१ हेक्टर आहे.व झालेले प्रत्यक्ष सिंचन ६६८८८ हेक्टर आहे.जिल्ह्यात २ मोठे प्रकल्प तसेच ७ मध्यम प्रकल्प व ९० लघू प्रकल्प असे एकूण ९९ प्रकल्प पूर्ण झाले असून, यापासून ८३१.४४ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा व १,१३,५१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्मित झाली आहे. तसेच २ मोठे प्रकल्प व १७ लघू प्रकल्प असे एकूण २१ प्रकल्प प्रगतिपथावर आहे, यामधील वर्धा बॅरेज हदगाव उपसा सिंचन योजना प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झालेले आहे.

टाकळी डोल्हारी मध्यम प्रकल्पाचे काम ४० टक्के पूर्ण झालेले आहे, तसेच इतर लघू प्रकल्पाचे कामे ९० ते ९५ टक्के पूर्ण झालेली आहे. या प्रकल्पाची सिंचन क्षमता ३,०४,९९१ हेक्टर असून, निर्मित सिंचन क्षमता ५९,२१९ हेक्टर व निर्मित पाणीसाठा ३०९.७७ दलघमी आहे. उपरोक्त प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सिंचनाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचे पाटबंधारे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन बनसोड यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT