mango Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Fruit Crop insurances : कोकण सोडून इतर भागांतील आंबा पिकासाठी विमा योजना

Mango Crop insurances : कोकण सोडून इतर भागातील आंबा पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे.

Team Agrowon

Vinaykumar Awate : ही योजना कोकण सोडून इतर भागातील आंबा पिकासाठी नगर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, वाशीम, जालना, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या १९ अधिसूचित जिल्हा, तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर असलेल्या शासकीय हवामान केंद्र आकडेवारीवरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते.

या योजनेअंतर्गत वय झालेल्या ५ वर्षे आंबा पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

आंबा(समूह ब) समाविष्ट जिल्हे ः नगर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, वाशीम, जालना, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलडाणा

आंबा (समूह क) समाविष्ट जिल्हे ः पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा

कोकण सोडून इतर भागांतील आंबा पिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२३

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता

हवामान धोके---विमा संरक्षित रक्कम रुपये प्रति हेक्टर---शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर

अवेळी पाऊस , कमी/ जास्त तापमान ---१,४०,०००/----७,०००/- ते २३,८००/-

गारपीट---४६,६६७/----२,३३४/-

योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा ः

जिल्हा --- विमा कंपनी

नगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार --- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली,सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर--- एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

रायगड, बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, धाराशिव--- भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड

शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग ः

१) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसुचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. मात्र भाडेकरार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२, ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

४) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे.)

५) एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

६) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येतो. मात्र विमा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला ५ टक्क्यांपेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.

७) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.

८) अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT