Cashew Crop Insurance : काजूसाठी विमा योजना

Cashew Crop : काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड , ठाणे, पालघर,नाशिक जिल्ह्यामधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे.
Cashew
CashewAgrowon
Published on
Updated on

Crop Insurance : काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड , ठाणे, पालघर,नाशिक जिल्ह्यामधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या जिल्ह्यात शासनामार्फत  अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर  संदर्भ हवामान केंद्र आकडेवारी वरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते.  या योजनेतंर्गत काजू ५ वर्ष वय झालेल्या पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस(आर्थिक)खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२३

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु)
अवेळी पाऊस
१ डिसेंबर ते
२८   फेब्रुवारी १.  एका दिवस ५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु.१३,००० /- देय
२.  सलग २ दिवस ५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. २६,०००/- देय
३.  सलग ३ दिवस ५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ४५,५००/- देय
४.  सलग ४ दिवस ५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ६५,०००/- देय
कमी तापमान
१ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी 

१. सलग ३ दिवस १३ अंश सेल्सिअस किंवा
त्यापेक्षा कमी झाल्यास रु. १४,०००/- देय
२. सलग ४ दिवस १३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. २१,०००/- देय
३. सलग ५ दिवस १३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. ३५,०००/- देय
एकूण विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर १,००,०००/-
गारपीट
१ जानेवारी ते ३० एप्रिल रु. ३३,३३३ /- ,यासाठी नुकसान झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानीची माहिती विमा कंपनी/ कृषि विभागास कळविणे आवश्यक आहे. यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर अंतिम करण्यात येते.


Cashew
Mosambi Crop Insurance : मोसंबीसाठी विमा योजना

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता

हवामान धोके विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर शेतकऱ्यांसाठी
विमा हप्ता रुपये प्रती हेक्टर योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा

जिल्हे                                                                            विमा कंपनी
सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी, नाशिक                  रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
ठाणे, कोल्हापूर                                           एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
रायगड                                                              भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड

अवेळी पाऊस, कमी तापमान                                    १,००,००० ५,००० ते १२,५००
गारपीट                                                                       ३३,३३३ १,६६७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com