Pomegranate
Pomegranate Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना

विनयकुमार आवटे

विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान (Fruit Crop Damage) होते. अशा नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी विमा संरक्षणाची (Crop Insurance) गरज आहे. आंबिया बहर (Ambiya Bahar) २०२२-२३ मधील संत्रा, मोसंबी, डाळिंब (Pomegranate), काजू, केळी, द्राक्ष, आंबा (Mango), स्ट्रॉबेरी आणि पपई या फळपिकांसाठी शासनाने हवामान आधारित पीकविमा योजना लागू केली आहे.

अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, गारपीट,जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा या हवामान धोक्यांपासून या योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे. सर्वसाधारणपणे ज्या महसूल मंडळात त्या फळपिकाखाली २० हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे अशा महसूल मंडळांना त्या फळपिकासाठी अधिसूचित करण्यात येऊन तेथे ही योजना राबविण्यात येते. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू राहणार आहे.

फळपीक--- उत्पादनक्षम वय (वर्ष)

संत्रा--- ३

मोसंबी--- ३

डाळिंब--- २

लिंबू--- ४

द्राक्ष--- २

आंबा--- ५

काजू--- ५

सीताफळ --- ३

निवडक जिल्हे आणि विमा कंपन्यांचे नाव

१) नगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशीम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार ः रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

२) बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातुर, कोल्हापूर ः एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

३) रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद ः भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड

योजनेचा तपशील ः

१) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.

२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेवू शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

४) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे)

५) अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहरापैकी, कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल (उदा. संत्रा, मोसंबी, डाळिंब)

६) एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

७) ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in

८) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा नियमित विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येतो. मात्र वास्तवदर्शी विमा हप्ता हा जर ३५ टक्क्यांहून अधिक असल्यास शेतकऱ्याला नियमित ५ टक्क्यांपेक्षा अधिक विमा हप्ता भरावा लागतो, म्हणून जिल्हानिहाय, पीकनिहाय विमा हप्ता वेगवेगळा असू शकतो.

-----------

चौकट ः फळपीकनिहाय प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम रुपये आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता.

टीप :

१) विमा हप्ता वास्तववादी दर ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, जो कमी दर आहे त्यानुसार शेतकऱ्यास विमा हप्ता भरावा लागेल.

चौकट ः फळपीकनिहाय विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके),

विमा संरक्षण कालावधी आणि विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक

या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. यात गारपीट व वेगाचे वारे यामुळे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस याबाबतची सूचना द्यावी लागेल. त्या नंतर वैयक्तिक पंचनामा करून नुकसान भरपाई अंतिम केली जाते.

संपर्क ः अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

---------------

(लेखक कृषी विभागात कृषी सहसंचालक (विस्तार व प्रशिक्षण) आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT