Goat Farming Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

पोहरासह सहा ठिकाणी होणार शेळी समूह योजना

टीम ॲग्रोवन 

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील पोहरा आणि राज्यातील पाच महसुली विभागात शेळी समूह योजना (Goat Cluster Scheme) (गोट क्लस्टर) राबविण्यास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. जानेवारी महिन्यात या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. सात कोटी ८१ लाखांची ही योजना यंदाच्या आर्थिक वर्षात राबविण्यात येणार आहे. (Goat Farming)

पशु व दुग्ध संवर्धन (Animal Husbandry Department) विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी महामंडळाच्या प्रक्षेत्रावर ही योजना राबविली जाणार आहे. बोंद्री (जि. नागपूर) येथील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, तीर्थ (जि. उस्मानाबाद) येथील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, रांजणी (जि. सांगली) येथील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, बिलाखेड (जि. जळगाव) येथील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि दापचरी (जि. पालघर) येथील मुंबई शहर, मुंबई उपनगरे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत तीन हजार शेतकरी सहभागी करण्यात येणार असून त्यांना शेळीपालनाचे प्रशिक्षण देण्यात येणारे आहे.

पोहरा येथे राबविण्यात येणाऱ्या योजनेत अमरावती, अकोला बुलडाणा, वाशीम, यवतमाळ या कार्यक्षेत्राचा समावेश असेल. नागपूर, वर्धा आणि हिंगोली या जिल्ह्यांचा तात्पुरत्या कालावधीसाठी समावेश करण्यात येणार आहे. नागपूर आणि औरंगाबाद महसुली विभागासाठी ज्यावेळी स्वतंत्र प्रक्षेत्र सुरू करण्यात येईल, तेव्हा पोहराच्या कार्यक्षेत्रातून नागपूर, वर्धा आणि हिंगोली जिल्हे वगळ्यात येणार आहेत.

योजनेचे स्वरूप

  • - या योजनेत तीन हजार शेतकरी सहभागी करण्यात येणार आहे.

  • - शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना शेळी पालनाचे प्रशिक्षण देण्यात येईल.

  • - कृत्रीम रेतन सुविधा उपलब्ध करून देणार

  • - शेळी उत्पादक कंपनी, फेडरेशन, संस्थांच्या माध्यमातून शेळी समूह निर्माण करण्यात येईल

  • - शेळी खरेदीसाठी समुहाच्या माध्यमातून मदत करणे

  • - पोहरा येथील साडेनऊ एकर क्षेत्रावर प्रशिक्षण केंद्र, निवासस्थान, शेळ्यांचे दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT