Abdul Sattar Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

POCRA : अधिकाधिक नागरिकांना ‘पोकरा’चा लाभ द्यावा

अधिकाधिक नागरिकांना ‘पोकरा’चा लाभ मिळवून द्यावा. ‘मनरेगा’तून अधिकाधिक रोजगार निर्मिती करावी. दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात,’’ असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

टीम ॲग्रोवन

अमरावती : ‘‘अधिकाधिक नागरिकांना ‘पोकरा’चा लाभ (Benefit Of POCRA) मिळवून द्यावा. ‘मनरेगा’तून (MANREGA) अधिकाधिक रोजगार निर्मिती (Employment) करावी. दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात,’’ असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिले.

‘माझा एक दिवस माझ्या शेतकऱ्यासाठी’ उपक्रमात सत्तार यांनी सादराबाडी येथे भेट दिली. त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यांची, तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा ग्रामसचिवालयाच्या प्रांगणात झाली. आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, सरपंच लक्ष्मी पटेल, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, आमदार राजकुमार पटेल, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा कृषी विकास अधिकारी जी. डी. देशमुख आदी उपस्थित होते. सादराबाडी येथे ग्रामपंचायत सभागृहासाठी २५ लाख रुपये निधी मिळवून देण्याची घोषणा सत्तार यांनी केली.

सत्तार म्हणाले, ‘‘आदिवासी क्षेत्रात कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. आदिवासी विकास महामंडळातर्फे धान्य खरेदीची प्रक्रिया वेळेत सुरू व्हावी. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा गतीने व्हावा. मेळघाटातील स्थलांतर थांबण्यासाठी ‘मनरेगा’तून अधिकाधिक कामे राबवावी. रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढवावे.’’

विविध योजनांच्या लाभाचे वितरण

सत्तार यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्या सोडविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या वेळी सत्तार यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभाचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT