Farm Pond Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farm Pond Scheme : शेततळे अस्तरीकरणासाठी ११७ कोटी रुपये मिळणार

Agriculture Irrigation Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी अंदाजे ११७ कोटी रुपयांचे अनुदान वाटण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांना शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी अंदाजे ११७ कोटी रुपयांचे अनुदान वाटण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे. त्यामुळे किमान १७ हजार तळ्यांचे अस्तरीकरण पूर्ण होऊ शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यात १५ मीटर रुंदी व ३ मीटर खोलीपासून ३० मीटर रुंदी व ३ मीटर खोलीपर्यंतची शेततळी खोदली जात आहे. मात्र त्यासाठी प्लॅस्टिक फिल्मचे अस्तरीकरण गरजेचे आहे. हा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळेच शेततळे खोदाई व्यतिरिक्त फिल्मसाठी देखील अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून गेल्या वर्षी १२१५ शेतकऱ्यांनी अस्तरीकरण केले. त्यांना ७ कोटी ९२ लाखांचे अनुदान देण्यात आले. याशिवाय राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अस्तरीकरण केलेल्या ४१४० शेतकऱ्यांना २७ कोटी ३२ लाखांच्या रुपयांच्या आसपास अनुदान दिले गेले आहे.

अस्तरीकरणामुळे शेतकऱ्यांना हक्काचा पाणीसाठा उपलब्ध होतो. यामुळे साठवलेले पाणी झिरपून वाया जात नाही, तसेच पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी तळ्यातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोत.

त्यामुळे यंदा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून १३८५ शेततळ्यांसाठी १० कोटी ३८ लाख रुपयांचे अनुदान वाटले जाईल. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना सर्वात जास्त म्हणजे १०७ कोटी रुपयांच्या आसपास अनुदान वाटले जाणार आहे. त्यामुळे १६१७३ शेततळ्यांचे अस्तरीकरण होईल.

...असे मिळणार अस्तरीकरणासाठी अनुदान

शेततळ्याचा आकार---अनुदानाची रक्कम (रुपयांत)

१५ × १५ × ३ मीटर - २८२७५

२० × १५ × ३ मीटर - ३१५९८

२० × २० × ३ मीटर - ४१२१८

२५ × २० × ३ मीटर - ४९६७१

२५ × २५ × ३ मीटर - ५८७००

३० × २५ × ३ मीटर - ६७७२८

३० × ३० × ३ मीटर - ७५०००

शेतकरी कष्टपूर्वक शेततळे खोदतात. राज्याच्या फलोत्पादन विकासात शेततळ्यांची भूमिका मोलाची आहे. त्यामुळेच अस्तरीकरणासाठी शेतकऱ्याला कमाल ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान वाटले जाणार आहे.
- डॉ. कैलास मोते, कृषी संचालक, फलोत्पादन विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT