Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीकविम्याचा ‘सर्व्हर डाउन’

Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता द्यावा लागणार आहे. त्यासाठी ऑनलाइन प्रस्ताव दाखल करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Team Agrowon

Amravati News : कृषी आयुक्‍तांच्या सूचनांकडे कृषी विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, सर्व्हर डाउन असल्याचे कारण देत एक रुपया पीकविमा योजनेत ‘सीएससी’ केंद्रसंचालकांकडून शेतकऱ्यांची लूट कायम आहे.

पीकविमा योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता द्यावा लागणार आहे. त्यासाठी ऑनलाइन प्रस्ताव दाखल करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत त्यानुसार आतापर्यंत एक लाखावर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयाचाच भरणा करावा लागणार असताना सीएससी केंद्र संचालकांकडून मात्र सर्वदूर १०० ते १३० रुपये आकारले जात आहेत.

एक रुपयाचा भरणा करताना सर्व्हर डाउन होतो, अशी थाप सीएससी केंद्रसंचालकांद्वारे मारली जात आहे. १०० रुपये विमा योजनेचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी तर ३० रुपये सातबारा काढण्यासाठी घेतले जात आहेत. हे सारे प्रकार बिनबोभाट घडत असताना कृषी विभागाकडून त्यावर नियंत्रणासाठी कोणतेच प्रयत्न होत नसल्याची स्थिती आहे.

कृषी विभागाचे दुर्लक्ष

कृषी आयुक्‍तांनी एका आदेशान्वये १ रुपयात असलेल्या पीकविमा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात सूचना केल्या होत्या. कृषी विभागाने शेतकऱ्यांची लूट होत असलेल्या केंद्रांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु जिल्ह्यात असे होताना दिसत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT