Crop Insurance : पीक विम्यासाठी एक लाख शेतकऱ्यांचे प्रस्ताव

Crop Insurance Scheme : विमा हप्ता भरावा लागत असताना २०२२ या वर्षातील हंगामात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत तब्बल १५ लाख ९१ हजार ५६४ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला होता.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : विमा हप्ता भरावा लागत असताना २०२२ या वर्षातील हंगामात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत तब्बल १५ लाख ९१ हजार ५६४ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला होता.

आता अवघ्या एक रुपयात विमा योजनेकरिता पात्र ठरत असताना आतापर्यंत केवळ १ लाख ५७ हजार ६०१ शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षित केले आहे. ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार असल्याने हा आकडा वाढेल असा विश्‍वास कृषी विभागाला आहे.

Crop Insurance
Crop Insurance : एक रुपयात पिकविम्यासाठी ३१ जुलै शेवटची मुदत

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. गेल्या हंगामापर्यंत पीकनिहाय शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागत होता. ही रक्‍कम काही हजारात होती. मात्र कंपन्यांकडून भरपाईच्यावेळी हात आखडता घेण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये विमा हप्ता भरण्याविषयी नाराजी होती.

Crop Insurance
Crop Insurance : एक रुपये पीकविम्याचा खर्च ५० ते ५०० रुपयांपर्यंत

२०२२ मध्ये व आतापर्यंत सहभागी शेतकरी

बुलडाणा ३५७१६९ ४२०८८

अमरावती २१९५५१ २०१०२

अकोला ३२३२८९ ८६६२

वाशीम २७६४३६ २७६१३

यवतमाळ ४१५११९ ५९१३६

एकूण १५९१५६४ १५७६०१

विमा कंपन्या व सरकारचे साटेलोट असल्याचे यापूर्वी सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरकारमध्ये हिंमत असले तर २०१४ पासून विमा हप्त्यापोटी कंपन्यांनी किती रक्‍कम घेतली याचे ऑडिट केले पाहिजे. सध्या एक रुपयात विमा योजना राबविण्यात येत असली तरी त्यात आमचाच कररूपी पैसा वापरला जात आहे. जर खरच शेतकऱ्यांचे हित साधायचे असेल तर केंद्र व राज्याची एक संयुक्‍त योजना आणत तेलंगणाच्या धर्तीवर पेरणीच्यावेळी ठरावीक रक्‍कम शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे.
- रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com