Shetale Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

'मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन' योजनेचा विस्तार

राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन' योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. या पुढे वैयक्तिक शेततळ्याचा समावेश या योजनेत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

Team Agrowon

राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन'(Mukhymantri Shashwat Krushi Sinchan) योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. या पुढे वैयक्तिक शेततळ्याचा (Shetatale) समावेश या योजनेत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्यामधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी 'मागेल त्याला शेततळे' या योजनेनुसार ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. मात्र या अनुदानात ५० टक्के वाढ केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विविध आकाराच्या वैयक्तिक शेततळ्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या खर्चाच्या मापदंडा एवढे किंवा ७५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात सरकारने यासंबंधी घोषणा केली होती. या घोषणेला राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT