Pm Kisan Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan Yojana: ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत ई-केवायसी करा’

PM Kisan Scheme : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला केंद्र सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो.

Team Agrowon

Dhule PM Kisan news : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला केंद्र सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ जून २०२३ मध्ये जमा होणार आहे.

केंद्र सरकारने या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचा लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न (जोडणे) व ई-केवासी प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे. या दोन्ही बाबी लाभार्थ्याने परिपूर्ण केल्याशिवाय त्यास पुढील हप्त्याचा लाभ अदा होणार नाही.

या पार्श्वभूमीवर लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाला वर्षातून तीन वेळा या योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे वर्षातून सहा हजार रुपये देण्यात येतात. आगामी १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे.

त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा केंद्रावर आधार हे बँक खात्याला संलग्न करून घ्यावे. यासाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्राच्या आधारे पोस्टात कर्मचाऱ्यांमार्फत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे.

बँक खाते ४८ तासांत आपल्या आधार क्रमांकाशी जोडले जाईल. ही पद्धत अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने सुलभ आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT