PM Kisan : ‘पीएम किसान’ योजनेसाठी ‘ई-केवायसी’ करा

Pm kisan scheme update : केंद्र शासनाने अँड्रॉईड मोबाइलवर फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication) ॲपद्वारे ‘पीएम’ किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
PM kisan KYC
PM kisan KYCAgrowon
Published on
Updated on

Solapur Pm kisan News : केंद्र शासनाने अँड्रॉईड मोबाइलवर फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication) ॲपद्वारे ‘पीएम’ किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचे तसेच इतर लाभार्थ्यांचे सुद्धा ई- केवायसी करता येणार आहे.

अशी आहे प्रक्रिया

१) सर्वप्रथम ‘PMKISAN Gol’ हे App डाउनलोड करून घ्यावे. तत्पूर्वी, जुने PMkisan App डिलिट करून पुन्हा PMkisan App २.०.० हे ॲप्लिकेशन Install करावे. त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर इंग्रजी व हिंदी यापैकी एक भाषा निवडा.

२) स्क्रीनवर New Farmer Registration आणि Login यापैकी ‘पीएम किसान’ योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांनी Login या बटणावर क्लिक करावे. अॅप वापरासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा पी.एम. किसान Registration Id किंवा आधार क्रमांक असणे आवश्यक आहे.

PM kisan KYC
PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेचा आता तरी मिटवा वाद

३) स्क्रीनवरील Login Type मधील Beneficiary पर्याय निवडून ‘पीएम’ किसान Registration Id किंवा आधार क्रमांकाद्वारे Login करण्यासाठी GET OTPॉ बटणावर क्लिक करा.

योजनेसाठी रजिस्टर केलेल्या मोबाइलवर आलेला चारअंकी OTP टाकून Login करावे. त्यानंतर पुढील स्क्रीनवर स्वतःचा सहा अंकी MPIN तयार करावा. MPIN च्या माध्यमातून लाभार्थ्यास App मध्ये Login करणे व e-KYC करणे सोयीचे होईल.

४) ज्या Registration Id किंवा आधार क्रमांकावरून Login केले, त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असल्यास "Your e-KYC is pending for completion" असा संदेश दिसेल. त्यानंतर Click here to complete your e-KYC यावर क्लिक केल्यावर लाभार्थ्यांनी तयार केलेला सहाअंकी MPIN तेथे टाकावा.

त्यानंतर Consent Form वर क्लिक करून Scan Face वर क्लिक करा. त्यानंतर समोर FaceRD App is not installed on device असा संदेश येईल आणि त्यावर Ok म्हणा.

त्यानंतर गुगल प्ले स्टोअर Aadhar FaceRd (Early Access) हे App Install करण्यासाठी उपलब्ध होईल ते Install करा. त्यानंतर मोबाइलमध्ये Capturing Face सुरू होईल, त्या वेळी आलेल्या सूचनांचे पालन करून Proceed या बटणावर क्लिक करावे.

५) मोबाइल समोर धरून चेहऱ्यावर प्रकाश दिसेल, अशा पद्धतीने Scan Face या बटणावर क्लिक करा. त्यानंतर Images captured successfully processing असा संदेश स्क्रिनवर आल्यानंतर Successful e-KYC असा संदेश दिसेल. म्हणजेच लाभार्थ्याचे e-KYC प्रमाणीकरण पूर्ण झाले.

इतर लाभार्थीचे e-KYC करण्यासाठी Dashboard वरील e-KYC for other beneficiaries'' या बटणावर क्लिक करा आणि वरीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केल्यास आपली प्रक्रिया पूर्ण होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com