Sweet Orange Insurance
Sweet Orange Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Sweet Orange Insurance : मोसंबीसाठी विमा योजना

विनयकुमार आवटे

मोसंबी पिकासाठी योजना (Sweet Orange Crop Insurance) अधिसूचित वर्धा, बुलडाणा, हिंगोली अकोला, नागपूर, नगर, अमरावती, धुळे, बीड, परभणी, पुणे, नांदेड, औरंगाबाद, जालना, जळगाव, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांमधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर संदर्भ हवामान केंद्र (Weather Center) आकडेवारीवरून नुकसानभरपाई (Crop Damage Compensation) अंतिम केली जाते.

या योजनेअंतंर्गत मोसंबी ३ वर्षे वय झालेल्या पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

संभाव्य पीक नुकसानीस विमा संरक्षण

---------------

भाग घेण्याचा अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२२

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ः

हवामान धोके---विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर---शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर

अवेळी पाऊस, जास्त तापमान , जास्त पाऊस---८०,००० ----४,०००ते ४,४००

गारपीट---२६, ६६७ ----१,३३४

योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा

१) नगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशीम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार ः रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,

२) बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर ः एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

३) रायगड, बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद ः भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड

शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग ः

१) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात.

२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल.कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

४) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे.)

५) शेतकरी मृग किंवा आंबिया पैकी एका बहरात भाग घेऊ शकतो.

६) एक शेतकरी ४ हेक्टर च्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

७) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून म्हणून देण्यात येतो. मात्र विमा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांना ५ टक्क्यांपेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.

८) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसानभरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.

संपर्क ः संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय

(लेखक कृषी विभागामध्ये कृषी सहसंचालक (विस्तार व प्रशिक्षण) आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT