Crop Damage Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा रक्कम

नुकसानग्रस्त चार लाख शेतकऱ्यांपैकी एक लाख शेतकऱ्यांच्या पीकविमा खात्यात जमा झाला आहे. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : नुकसानग्रस्त चार लाख शेतकऱ्यांपैकी एक लाख शेतकऱ्यांच्या पीकविमा (Crop Insurance) खात्यात जमा झाला आहे. पीकविम्याची रक्कम (Crop Insurance Compensation) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. उशिरा का होईना पीकविमा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे.

पीकविम्याचा हप्ता भरल्यानंतरही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही, असा काही वर्षातील अनुभव आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. यंदा जिल्ह्यात चार लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.

पीकविमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची संख्या कमी असतानाच जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळावी, याकरिता पूर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या त्यापेक्षाही कमी आहे. कृषी विभागाने चार लाख शेतकऱ्यांपैकी केवळ दोन लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण केलेले आहेत. त्यातील १ लाख ५ हजार शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर केला आहे.

पीकविमा कंपनीने ८३ कोटी रुपये जिल्ह्यासाठी मंजूर केले आहेत. संबंधित कंपनीला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला असला तरी अजूनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीकविमा मंजूर झाला होता. तो शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी आमचा पाठपुरावा सुरूच आहे. पहिल्या टप्प्यातील मदत वितरणास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होत आहे.
नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT